शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संतप्त नागरिकांची पोलिसांवर दगडफेक

By admin | Updated: May 19, 2017 00:25 IST

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : चिखली ते टाकरखेड मुसलमान रस्त्यावर गुरुवारी सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाला. त्यानंतर या ठिकाणी असलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांना बोलाविले. मात्र, पोलिसांना यायला उशीर झाल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. चिखली - खामगाव रोडवर टाकरखेड मुसलमान येथील विनोद रामदास गायकवाड (वय ३८) सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. दरम्यान, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. यावर त्याच्या नातेवाईकांनी अमडापूर पो.स्टे.ला माहिती दिली; परंतु पोलीस या अपघात घडलेल्या ठिकाणी आले नाही. त्यानंतर मृतकांच्या नातेवाईकांनी बुलडाणा येथील अधिकारी व लोकप्रतिनिधींना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यावर हाकेच्या अंतरावर असलेले अमडापूर पो.स्टे.चे ठाणेदार भूषण गावंडे व त्याचे सहकारी घटनास्थळी पोहचले. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांवर रोष व्यक्त करून दगडफेक केली. यामध्ये ठाणेदार गावंडे यांना किरकोळ इजा झाली. त्यानंतर माजी जि.प. सदस्य श्याम पठाडे, एकनाथ जाधव व संतोष वाकडे यांनी या ठिकाणी आलेल्या मृतकाच्या नातेवाईकांची समजूत घालून मृतक विनोद रामदास गायकवाड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी ठाणेदार गावंडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारासुद्धा मृतकाच्या नातेवाईकांनी देऊन अमडापूर पोलिसांचा निषेध केला. या घटनेतील अज्ञात वाहनचालकांविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ) १३४, १८३, १८४ मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहेत. या अपघातातप्रकरणी मृत्यू झालेले विनोद रामदास गायकवाड यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, तीन भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे.