मोताळा (बुलडाणा) : स्मार्ट फोनमुळे व्हॉटस् अँपधारकांची संख्या वाढत असून, व्हॉटस् ग्रूप तयार करून त्यावर विविध प्रकारच्या माहितीसह मनोरंजन तर अनेक वेळा बीभत्स चित्र, मजकूर व व्हिडिओ पाठविण्याचे तरूणवर्गामध्ये मोठे फॅड आलेले आहे; मात्र व्हॉटस् अँपच्या उपयोगीतेबरोबरच त्याचे दुष्परिणामसुद्धा दिसून येत आहे. भविष्यात उद्भवणार्या परिणामांची पुसटशी कल्पना व कायद्याचे ज्ञान नसलेल्या अशाच एका ग्रूप सदस्यावर आज २0 सप्टेंबर रोजी त्यास पोलिस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली.मयूर भावसार रा. बर्हानपूर (मध्यप्रदेश) वय २४ असे अटक करण्यात आलेल्या व्हॉटस् ग्रू पमधील सदस्याचे नाव आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी शफी शाह मुसा शाह वय ३५ रा. कोथळी यांच्या व्हॉटस् अँप ग्रूपमधील ९५४५७00५८६ या मोबाईल क्रमांकावर बर्हानपूर येथील मयूर भावसार या युवकाने ९१७९५५५६४६ या मोबाईल क्रमांकावरून धार्मिक भावना दुखावतील असा मजकूर पोस्ट केला. सदर आक्षेपार्ह मजकूर १९ स प्टेंबरच्या रात्री १0 वाजता व्हॉटस् अँपवर पोस्ट करण्यात आला होता. याबाबतची तक्रार शफी शाह यांनी १९ सप्टेंबर रोजी रात्री बोराखेडी पोलिस स्टेशनला दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरून रात्रीच बर्हानपूर येथे जावून आरोपी मयूर भावसार यास अटक करून, त्याच्याविरूद्ध कलम ६६ अ २९५ भादंविनुसार सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बोराखेडी पोलिसांच्या या कारवाईमुळे व्हॉटस् अँपधारकांनी चांगलीच धास्ती घेतली असून, जे ग्रू प अँडमिन असतील त्यांनी बनविलेला ग्रूप डिलीट करणे व इतरांच्या ग्रूपमधून स्वत:ला लेफ्ट करणे हाच कार्यक्रम व्हॉटस् अँपधारकांचा दिवसभर सुरू होता.
व्हॉटस अँप ग्रूपमधील सदस्याला अटक
By admin | Updated: September 21, 2014 00:37 IST