शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव धाड परिसरात मिरची लागवडीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:56 IST

धामणगाव धाड : परिसरात मिरची लागवडीस शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे़ नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मिरचीला पसंती दिल्याने लागवड ...

धामणगाव धाड : परिसरात मिरची लागवडीस शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे़ नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मिरचीला पसंती दिल्याने लागवड क्षेत्र वाढणार असल्याचे चित्र आहे़

गत दोन तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळ व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ यावर्षी पारंपरिक पीक मका, कपाशीचे उत्पादन घटल्याने लागवड खर्चही निघाला नाही़ मिरची लागवड केल्यामुळे दोन ते अडीच महिन्यांत उत्पन्नाला सुरुवात होत असल्यामुळे मागच्या वर्षी प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात काही प्रमाणात का होईना मिरची लागवडीकडे वळला आहे; पण यंदाही शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली आहे़ तसेच शेतकऱ्यांना मिरची लागवड करण्यासाठी मिरची रोपसुद्धा परिसरातील रोपवाटिकेतून शेताच्या बांधावर मिळत आहे़ परिसरातील धामणगावसह मासरूळ डोमरूळ, तराडखेड धाड या परिसरात मिरची लागवड होताना दिसत आहे़ पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत परिसरातील शेतकरी नवनवीन प्रयोग करीत आहेत़ शेतकरी आता पूर्वहंगामी मिरची लागवडीकडे वळला आहे़ पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकरी लागवड करीत आहे. एप्रिल महिन्यापासूनच परिसरात मिरची लागवडीला सुरुवात झाली आहे.

मल्चिंग पेपरचा जास्त वापर

मिरची लागवड करताना मल्चिंग पेपरचा वापर शेतकरी करीत आहेत़ मिरची लागवड केल्यानंतर मल्चिंग पेपरमुळे पाणी कमी प्रमाणात लागते, तसेच गवत होत नाही़ त्यामुळे मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही़ त्यामुळे मल्चिंगचा वापर जास्त प्रमाणात होत आहे़

सतीश जंजाळ, शेतकरी धामणगाव धाड

मल्चिंग पेपर सरतेशेवटी इतरत्र फेकून न देता त्याची योग्य विल्हेवाट लावून पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही याची दक्षता घेणे ही प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी आहे.

प्रकाश पाटील, शेतकरी धामणगाव धाड