शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

बुलडाणा जि.प.च्या तीन कर्मचा-यांना दंड

By admin | Updated: April 12, 2016 01:24 IST

राज्य माहिती आयोगाचा दणका; माहिती न देणे भोवले.

चिखली (जि. बुलडाणा): माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती देण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाने बुलडाणा जिल्हा परिषदेचे तत्कालीन सहायक जन माहिती अधिकारी संदीप रिंढे व एस.आर. कासारे व जनमाहिती अधिकारी अहिरे यांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा निकाल २९ मार्च रोजी देण्यात आला असून, याबाबत आदेशाची प्रत ९ एप्रिल रोजी तक्रारकर्ता दत्ता खेडेकर यांना प्राप्त झाली. चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील दत्ता विजय खेडेकर यांनी बुलडाणा जिल्हा परिषदेकडे जि.प. मराठी शाळामधील सहायक शिक्षकांची रिक्त पदे व अतिरिक्त शिक्षकांची माहिती २ मे २0१३ रोजी माहितीच्या अधिकारातून मागितली होती; मात्र सदर माहिती अर्जदारास मिळाली नाही. यानंतर अर्जदाराने प्रथम अपिली अधिकारी तथा शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज केले. तेथेही माहिती न मिळाल्यामुळे पुढे जनमाहिती अधिकारी तथा अधीक्षक प्राथ. शिक्षण विभाग यांच्याकडे अर्ज केला असता, त्यांच्याकडून माहिती मिळाली नाही. यामुळे अर्जदार दत्ता खेडेकर यांनी राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे अपील केल होते.