शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर स्थिरावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:30 IST

गेल्या २८ दिवसात जिल्ह्यात कोराेनाचे १० हजार रुग्ण सापडले असून, गेल्या एक वर्षाचा विचार करता तब्बल ४० टक्के रुग्ण ...

गेल्या २८ दिवसात जिल्ह्यात कोराेनाचे १० हजार रुग्ण सापडले असून, गेल्या एक वर्षाचा विचार करता तब्बल ४० टक्के रुग्ण हे गेल्या २८ दिवसात सापडल्याने कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात झपाट्याने होत असल्याचे चित्र आहे. परिणामी कोविड केअर सेंटर आणि कोविड समर्पित रुग्णालयात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे डिसेंबरअखेर जिल्ह्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले होते ते झपाट्याने घसरले होते. त्यामुळे चिंता निर्माण झाली होती. मात्र, आता कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले नसले तरी ते ८५ टक्क्यांवर स्थिरावल्याचे चित्र आहे. हा जिल्ह्यासाठी मोठा दिलासा म्हणावा लागले. मात्र, या २८ दिवसात जिल्ह्यात तब्बल ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने काहीशी चिंता निर्माण झाली आहे. मृत्यू पावलेल्या बहुतांश जणांना दुर्धर आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या एक वर्षाच्या काळात १ लाख ९२ हजार ५८८ संदिग्धांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये आरटीपीसीआरद्वारे १ लाख ३२ हजार १४८, अँटिजेनद्वारे ९,५७७ आणि रॅपिड टेस्टद्वारे ५२ हजार ७९१ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी १३ टक्के अर्थात २५ हजार १३० जण आतार्पंत कोरोना बाधित आढळून आले आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोराेना बाधितांचे प्रमाण जिल्ह्यात वाढत असून, १४ मार्च रोजीचा बुलडाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा तब्बल ३४ टक्के आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.

-- ७ टक्के नागरिकांच्या चाचण्या--

गेल्या एक वर्षाच्या काळात जिल्ह्याच्या लोकसंख्येशी तुलना करता आतापर्यंत केवळ ७ टक्के नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. म्हणजेच २६ लाख ८५ हजार लोकांपैकी १ लाख ९२ हजार ५८८ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

--असे आहे चाचण्यांचे प्रमाण--

आरटीपीसीआर : ६९ टक्के

ट्रुनॅट:- ४.९७ टक्के

रॅपीड टेस्ट:- २७.९३ टक्के

--कोविड केअर सेंटर हाऊसफुल

जिल्ह्यात सध्या ३,५०८ सक्रीय रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेले कोविड केअर सेंटरही सध्या फुल झाले आहेत. त्यातच प्रशासनाच्या वतीने नवीन कोविड केअर सेंटरसाठी जागांचा शोध सुरू आहे. बंद केलेली काही कोविड केअर सेंटरही सुरू करण्यात आली आहेत. सध्याची सक्रिय रुग्ण संख्या ही आतापर्यंतची जिल्ह्यातील महत्तम संख्या आहे.