शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णास डेंग्यूसदृश आजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:28 IST

हिवराआश्रम : येथे डेंग्युग्रस्त महिला रुग्ण आढळल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक भयग्रस्त झाले आहेत. या बाबतीत आरोग्य विभाग अनभिज्ञ असून, विविध साथीच्या आजाराच्या रुग्णांची अजूनही संबंधित कर्मचारी यांनी दखल घेतली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत असून  परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा उभा राहीला आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभाग अनभिज्ञ स्वच्छता अभियान राबविण्याची गरज!

लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : येथे डेंग्युग्रस्त महिला रुग्ण आढळल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक भयग्रस्त झाले आहेत. या बाबतीत आरोग्य विभाग अनभिज्ञ असून, विविध साथीच्या आजाराच्या रुग्णांची अजूनही संबंधित कर्मचारी यांनी दखल घेतली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत असून  परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा उभा राहीला आहे.हिवरा आश्रम गावाची लोकसंख्या जवळपास पाच हजारापर्यंत असून येथे विवेकानंद आश्रमाच्या संस्थेचे अनेक विद्यार्थी निवासी आहेत. गावातही अनेक महत्वाच्या ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्या तुंबलेल्या आहेत. गावात कचराकुंडीची व्यवस्था नसल्याने नागरिक घरातील कचरा हा रस्त्यालगतच्या टाकत असल्याने घाणीचे साम्राज्य वाढत आहे. यातूनच जलजन्य तसेच इतरही आजाराचे प्रमाण वाढत आहे. या घाणीसंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन तथा आरोग्य विभाग ह्यांनी कुठलीही तजविज केलेली नाही. गावातील नागरिकांना या घाणीसंदर्भात कुठलेही प्रबोधन करण्यात आलेले नाही. दरम्यान संगिता वसंतराव हिवाळे या महिलेस डेंग्यू आजाराची लागण झाली होती. त्या येथील दवाखान्यात उपचाराकरीता दाखल झाल्या असता  त्यांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यु सदृश्य ताप असल्याचे निदर्शनास आले, त्यांच्यावर यादृष्टीने उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. तरी स्थानिक आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन यांनी स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे असून, याकरीता नागरिकांनाही त्यांना स्वच्छतेसाठी पुढाकार घेणे क्रमप्राप्त झाले आहे. 

सदर रुग्णाला डेंग्यूसदृश ताप असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घराभोवती व घरामध्ये घाण पाणी साचून ठेवू नये. त्याचप्रमाणे घर डास व घाणीपासून स्वच्छ ठेवावे.-डॉ.महेश अनिल रोकडे, हिवराआश्रम.-