शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
4
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
5
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
6
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
7
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
8
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
9
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
10
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
11
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
12
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
13
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
14
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
15
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
16
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
17
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
18
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
19
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
20
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

निक्षय पोषण योजनेचा क्षय रुग्णांना मिळतोय आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 14:14 IST

एप्रिल २०१८ पासून ही योजना कार्यान्वीत केली असून जिल्ह्यातील साडेचार हजार क्षयरुग्ण या योजनेचा लाभ घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पूरक पोषण आहारही रोगापासून व्यक्तीला दूर ठेवण्यास मदत करतो. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्षयरुग्णांसाठी निक्षय पोषण योजना आधार ठरत आहे. एप्रिल २०१८ पासून ही योजना कार्यान्वीत केली असून जिल्ह्यातील साडेचार हजार क्षयरुग्ण या योजनेचा लाभ घेत आहेत.जिल्ह्यात महिन्याकाठी जवळपास १६० संशयीत रुग्ण आढळत असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. मधल्या काळात जिल्ह्यात १२६ क्षय रुग्ण एका सर्व्हेक्षणादरम्यान आढळून आले होते. त्यांच्यावरही उपचार करण्यात ेत आहे. प्रामुख्याने संसर्गातून हा आजार होता. बहुतांशवेळा प्रतिकार शक्तीची कमतरतेमुळे प्रामुख्याने व्यक्ती आजाराला बळी पडतो. मधल्या काळात सुमारे ३००० संशयीत रुग्ण आढळून आले होते. त्यांचे थुंकीचे नमुने, एक्सरे काढल्यानंतर तपासणीअंती १२६ क्षयरोगाचे रुग्ण असल्याचे समोर आले होते. खाणपानात झालेला बदल पाहता नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार बळावतो. त्यादृष्टीने अशा बाधीत रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार एक एप्रिल २०१८ पासून उपचारावरील सर्व क्षय रुग्णांसाठी निक्षय पोषण आहार योजना अर्थात पोषण आहार भत्ता योजना सुरू करण्यात आली आहे. प्रामुख्याने या योजनेतंर्गत नियमित उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांना उपचार कालावधीत यात ५०० रुपये दरमहा पोषण आहार भत्ता देण्यात येत आहे. आदीवासी भागाकरीता हा भत्ता ७५० रुपये असल्याची माहिती डॉ. मिलींद जाधव यांनी दिली. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात दोन हजार ८०० क्षयरुग्ण आहेत. या योजनेच्या माध्यमातून क्षयरुग्णांना पुरक पोषण आहारासाठी हा भत्ता देण्यात येतो. त्यातून पोषमयुक्त आहार या रुग्णांना मिळावा व त्यांचे आरोग्य सुधारावे हा सकारात्मक दृष्टीकोण असून, नियमित स्वरुपात उपचार सुरू रहावे अशी भूमिका यामागे आरोग्य विभागाची असल्याचे समोर येत आहे.

जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजारक्षय रोग हा ‘मायकोबॅक्टेरिमय च्युबरक्युलोसिस’ नावाच्या जिवाणूमळे होणारा संसर्गजन्य असा रोग आहे. प्रामुख्याने फुफ्पुस व इतर कोणत्याही अवयवाचा तो असू शकतो. हाडे, सांधे, मज्जातंतूचा क्षय रोग होऊ शकतो. वजन कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थुंकीतून रक्त पडणे आणि सायंकाळी येणारा लाक्षणिक ताप ही या आजाराची लक्षणे असू शकतात.

७८ टक्के रुग्णांनी घेतला लाभएप्रिल २०१८ पासून सुरू झालेल्या या योजनेतंर्गत आतापर्यंत चार हजार ४२४ उपचार घेणाºया क्षय रुग्णांनी या या पुरक पोषण आहार भत्ता योजनेचा लाभ घेतला आहे. त्यापोटी या रुग्णांना ६९ लाख ५८ हजार ५०० रुपयांचे देण्यात आले असल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा