शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

प्रवाशांमध्ये दहशत अन धावपळ

By admin | Updated: July 8, 2014 23:22 IST

पोलिसांचे प्रात्यक्षिक : बसस्थानकावर पकडले दोन अतिरेकी

बुलडाणा : ठिकाण बुलडाणा बसस्थानक.. वेळ दुपारी ४.४५ ची.. बसस्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची धावपळ सुरू होती.. कोणी बसमध्ये जागा पकडण्यात, तर कोणी बसमधून उतरण्यात गर्क होते. तेवढय़ात बसस्थानकावर अचानक पोलिसांच्या गाड्यांचा ताफा येतो. चार पोलिस व्हॅन, दंगाकाबु पथक, डॉगस्कॉड, अग्निशामक दल, रुग्णवाहिका व पोलिसांच्या इतर गाड्या बसस्थानक परिसरात दाखल होतात. एका पोलिस व्हॅनमधून दंगाकाबु पथकातील शस्त्रधारी कमांडो धावतच खाली उतरतात आणि प्रवाशांना बसस्थानक सोडण्याचे आवाहन करतात. प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट व पळापळ सुरू होते. काही क्षणात बसस्थानक परिसर रिकामा होतो.. नेमके काय होत आहे, हे कोणालाच कळायला मार्ग नव्हता.. तेवढय़ात चिखलीकडे जाणार्‍या बसेसच्या प्लॅटफॉर्मवर उभी असलेली बस क्र. एम. एच. ४0/ ८३९४ या बसला बंदूकधारी कमांडोजने घेराव टाकला. हातातील रिव्हॉल्वर व बंदुका पुढे सरसावल्या. काय होतय, हे कळण्याआधीच कमांडोजचे एक पथक बसमध्ये प्रवेश करते आणि बसमध्ये जोरदार फायरींग सुरू होते. सर्वच स्तब्ध होतात.. सार्‍यांची उत्सुकता ताणल्या जाते..पोलिसांनी कोणावर गोळीबार केला? या बसमध्ये नेमके कोण आहे? डोके चकारावून सोडणार्‍या या घटनेने काही वेळ कोणीच कोणाशी बोलत नाही आणि थोड्याच वेळात बसमधून दोन व्यक्तींना पोलिस बाहेर काढतात. डोक्याला व तोंडाला कापड बांधलेले आणि हातात शस्त्र असलेले हे दुसरे तिसरे कोणी नसून चक्क आतिरेकी होते. बुलडाणा बसस्थानकावर उभी असलेली ही बस अतिरेक्यांनी हायज्ॉक केली होती. अखेर पोलिसांनी शिताफीने या अतिरेक्यांना ताब्यात घेतले आणि सार्‍यांनीच सुटकेचा श्‍वास घेतला; पण थांबा.. हे पकडलेले अतिरेकी खरेखुरे नव्हते तर, बुलडाणा पोलिस दलाच्या दहशतवादी विरोधी कृती दलाने घेतलेले ते एक प्रात्यक्षिक होते. जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्‍वेता खेडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी समिर शेख आणि बुलडाणा पोलिस दलातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी हे प्रात्यक्षिक यशस्वी केले. बसस्थानकावर अतिरेक्यांच्या टोळीने एखादी बस हायज्ॉक करून प्रवाशांना ओलीस ठेवल्यास अशावेळी प्रवाशांच्या जीविताला धोका न होऊ देता, प्रवाशांची सुखरूप सुटका करून अतिरेक्यांना कसे कंठस्नान घालायचे, याचे हे प्रात्यक्षिक होते. तब्बल अर्धातास चाललेल्या या घटनाक्रमानंतर जेव्हा उपस्थित शेकडो प्रवाशांना ही बाब कळाली तेव्हा अनेकांनी पोलिसांचे कौतुक केले. या प्रात्यक्षिकामध्ये सुरक्षा शाखेचे पोलिस निरीक्षक दीपक कोळी, पोनि. बुधवंत, पोनि. रफिक शेख, पोनि. भांबरे, पवार, खंडारे तर बुलडाणा पोलिस स्टेशनचे पोनि. तांदुळकर, पोकॉं. संजय गवई, देशमुख, काळे, अ.हमीद यांच्यासह जवळपास १५0 पोलिस कर्मचार्‍यांचा सहभाग होता.