शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

१२५ देशी दारू दुकानांना पार्किंगची सक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:16 IST

बुलडाणा : देशी दारूची दुकाने अनेक ठिकाणी भरवस्तीमध्ये  असल्याने निर्माण होणार्‍या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून यापुढे  या दुकानांना वाहनतळ सक्ती करण्यात आली आहे. तसेच  वाहनतळ अकृषक जागेत असल्याचा पुरावा दिल्याशिवाय   परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क  विभागाने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १२५ देशी दारू  दुकानांना पार्किंगची सुविधा करावी लागणार आहे.  

ठळक मुद्देदुकाने गावाबाहेर स्थलांतरीत करावी लागणार!  दुकानासमोर २५ चौरस मीटर जागा आवश्यक 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : देशी दारूची दुकाने अनेक ठिकाणी भरवस्तीमध्ये  असल्याने निर्माण होणार्‍या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून यापुढे  या दुकानांना वाहनतळ सक्ती करण्यात आली आहे. तसेच  वाहनतळ अकृषक जागेत असल्याचा पुरावा दिल्याशिवाय   परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क  विभागाने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १२५ देशी दारू  दुकानांना पार्किंगची सुविधा करावी लागणार आहे.   जिल्ह्यात सध्या १२५ देशी दारुची दुकाने (सीएल ३), १८  विदेशी दारु दुकाने (एफएल २), २३५ परमिट रुम बार  (एफएल ३), आणि ५२ बिअर व वाइन विक्री दुकाने  (एफएल/बीआर २) असे एकूण ४३0 मंजूर अनुज्ञप्तींची सं ख्या आहे. त्यातील १२५ देशी दारूची दुकाने ग्रामीण भागात  मोठय़ा प्रमाणात आहेत. ग्रामीण भागात लोकसंख्या झपाट्याने  वाढत असताना बहुतेक दुकाने गावाच्या मध्यभागी आहेत. त्या तील बहुतांश देशी दारूच्या दुकानमालकांनी आपल्या  ग्राहकांसाठी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही.  त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्याच्या ठिकाणी देशी दारू  विक्री दुकानांसमोर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. ते थील दुकानचालकही वाहतूक कोंडीकडे कानाडोळा करत  असल्यामुळे देशी दारू दुकानांना वाहनतळ सक्ती करण्याचा  निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.  

दुकानासमोर २५ चौरस मीटर जागा आवश्यक जिल्ह्यातील सध्याची दुकाने १६ चौरस मीटर किंवा त्यापेक्षा कमी  जागेत आहेत. मद्यपींची संख्या वाढल्यामुळे कोंदट जागेतच  ग्राहकांना बसावे लागत आहे. त्यामुळे दुकानांसाठी यापुढे २५  चौरस मीटर जागेची सक्ती करण्यात आली आहे. संबंधित  दुकानदाराने आपले वाहनतळ हे अकृषक (एन.ए.) जागेत  असल्याचा पुरावा दिल्याशिवाय यापुढे देशी दारू विक्री  दुकानांच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाणार नाही.  

पार्किंग सक्तीचे शासनाने आदेश दिले आहेत; परंतु प्रकरण  न्यायप्रविष्ठ असल्यामुळे पुढील आदेशापर्यंत अंमलबजावणी  थांबविण्यात आली आहे. -एस.एल.कदम, जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, बुलडाणा.