बुलडाणा : जिल्ह्यातील आदीवासी फासेपारधी समाजाच्या वतीने विविध मागणीसाठी गांधी भवन बुलडाणा येथून ८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.२00५ सालच्या वन कायद्याप्रमाणे जिल्ह्यातील आदिवासी फासेपारधी समाजातील लोकांचे एफ क्लास व ई क्लास जमिनीवरील अतिक्रमण कायम करणेबाबत तसेच समाजातील होतकरूंना बटेरपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन यासाठी अनुदान तसेच दारिद्रय रेषा कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, घरकुल योजनेसमवेत इतर शासकीय योजनेचा लाभ मिळणेबाबत सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवराज पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे संध्या पालसिंग पवार या ९ वर्षाच्या चिमुकलीने इंग्रजी भाषेमध्ये भाषण देवून उपस्थित जनसमुदाय व महसूल तसेच पोलीस अधिकार्याची मने जिंकलीत. श्रीकृष्णकृपा बहु. फासेपारधी समाज विकास संस्था अध्यक्ष युवराज पवार, महाराष्ट्र आदिवासी फासेपारधी सेवा संस्था अध्यक्ष दिपु पवार, प्रकाशपर्व संस्थेचे अध्यक्ष पालसिंग पवार व मुलनिवासी मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सोनोने यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्चासाठी प्रमिला धर्मराज पवार, जयेंद्र पवार, बादल पवार, इंनु शिंदे, कोलाराम भोसले, छगन भोसले, अनिल पवार, सुरेश पवार, समाधान पवार, छगन चव्हाण, जयराम भोसले, देखना पवार, सुकलाल पवार, बाबुलाल पवार, एकनाथ चव्हाण, चपट शिंदे, भुरभूर भोसले, अतुल भोसले, गोदलम पवार, रामा पवार, मधु पवार, भामा चव्हाण, भारत भोसले, रोहिली पवार आदींची उपस्थिती होती.
पारधी समाजाचा मोर्चा
By admin | Updated: August 9, 2014 00:04 IST