शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून ‘पंढरपूर स्पेशल’ रेल्वेगाडी रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 10:59 IST

'Pandharpur Special' train canceled for two years : सलग दुसऱ्या वर्षी आषाढीत पंढरपूर रेल्वे रद्द करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : आषाढी एकादशीच्या पर्वावर दरवर्षी खामगाव ते पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या प्रकोपाने सलग दुसऱ्या वर्षी आषाढीत पंढरपूर रेल्वे रद्द करण्यात आली आहे. यामुळे रेल्वे प्रशासनालाही लाखोंचा फटका बसला आहे. तसेच भाविकांमधूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.   पंढरपूर यात्रा ही विठ्ठल भक्तांसाठी पर्वणी असते. मिळेल त्या वाहनाने वारकरी पंढरपूर गाठतात आणि विठ्ठलाचे मनोभावे दर्शन करून परत येतात. संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वरांपासून तर आजतागायत ७५० वर्षांपासून वारीची पंरपरा चालत आली आहे. यापूर्वी प्लेगची महामारी आली. मात्र, प्रशासनामध्येच एवढी जनजागृती नसल्याने त्यावेळीही वारी अव्याहत पार पडली. तथापि, दीड वर्षामध्ये कोरोना संसर्गाने यात्रा रद्द झाल्या आणि मंदिरांची कुलूपे उघडली गेली नव्हती. यंदा पंढरपूर येथे पालख्या एसटी बसने पाठविण्यात आल्या आहेत. भक्तांची गर्दी होणार नाही, याची काळजी शासन घेत आहे. त्यामुळे यात्रा भरणार नाही. एसटी बसही पंढरपूर यात्रेच्या अनुषंगाने धावण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे रेल्वे प्रशासनाने पंढरपूर विशेष रेल्वे रद्दचा निर्णय घेतला आहे. खामगाव रेल्वे स्थानकातून प्रवासी रेल्वे धावत नाहीत. केवळ मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे धावतात. मात्र, भाविकांसाठी पंढरपूर रेल्वे सुरू करण्यात आली होती. दरवर्षी आषाढीला पंढरपूरला जात होती. 

रेल्वे प्रवासाने विठुरायाचे दर्शन अल्प खर्चात पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी, शेतकरी आणि सामान्यांना रेल्वे गाडीचा प्रवासच परवडणारा आहे. रेल्वे गाडीचा सुखकर प्रवास असतो. कमी खर्चात पंढरीत वि्ठ्ठलाचे दर्शन घेता येते. मात्र, यावर्षी  मंदिर बंद असल्याने भाविकांच्या आनंदावर विरजण पडले असल्याच्या प्रतिक्रिया भक्तांनी दिल्या आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावPandharpurपंढरपूरIndian Railwayभारतीय रेल्वे