शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सभापती, ग्रामसेवकांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2017 00:44 IST

भिवगाव बु. गावातील महिला पाण्यासाठी आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव राजा : गावातील पाणीटंचाई दूर करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील भिवगाव बु. येथील महिलांनी देऊळगाव राजा पंचायत समिती सभापती व ग्रामसेवकास २४ मे रोजी घेराव घालून आंदोलन केले.देऊळगाव राजा तालुक्यातील भिवगाव बु. गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई असल्याने येथील महिलांना, नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावासाठी दोन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत, तर गावात १५ दिवस नळाला पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासाठी २४ मे रोजी दुपारी स्थानिक पंचायत समिती सभापती दालनात पंचायत समिती सभापती रजनी चित्ते आणि ग्रामसेवक शारदा नवले यांना घेराव घातला आणि जोपर्यंत गावातील पाण्याची समस्या सुटणार नाही, संबंधित दोषी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी महिलांनी केली आहे.यापूर्वी २७ मार्च रोजी स्थानिक पंचायत समिती परिसरात सरंपच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असल्याने प्रत्येक गावास पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी प्रत्येक गावाचे सरपंच आणि ग्रामसेवकाला पाण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यासाठी निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने भिवगाव बु. येथील पाण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या दोन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या होत्या. तरीही १५ दिवस नळाला पाणी येत नाही. तसेच सरंपच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. शेवटी भिवगाव बु. येथील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत घेराव आंदोलन करून निवेदन दिले. यावेळी स्वभिमानी शेतकरी संघटनाचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी रीतसर चर्चा करून त्वरित भिवगाव बु. येथे पिण्याच्या पाणीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. यावेळी शीला गोळे, कासिंदा मुळे, सविता मुळे, सारिका शिंदे, तुळसाबाई कामठे, वच्छलाबाई निकाळजे, इंदूबाई घाडगे, रमा मुळे, विमल मुळे आदी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.