शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बँक खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक!

By admin | Updated: March 6, 2017 01:52 IST

पॅनकार्डसाठी आता ग्रामपातळीवर जनजागृती.

बुलडाणा, दि. ५- कोणत्याही बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड नंबर आवश्यक राहील, असे रिझर्व्ह बँक ऑफ इडियाने जाहीर केले आहे. याबाबत ग्रामीण नागरिक व शेतकर्‍यांना माहिती व्हावी, यासाठी ग्रामीण भागात दवंडी देऊन जागृती करण्याचे काम जिल्ह्यात सुरु आहे.नोटाबंदीनंतर नागरिकांच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आली. आता बँकेतील आर्थिक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी नवीन बँक खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड नंबर बंधनकारक केला आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून १५ डिसेंबर २0१६ रोजी आदेश काढण्यात आला. त्याची अंमलबजावणी २८ फेब्रुवारी २0१७ पासून सर्वत्र सुरु करण्यात आली आहे. बँक खात्याला आधारकार्ड लिंक करण्याच्या धर्तीवर सदर उपाययोजना करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांमध्ये याबाबत जागृती आहे, मात्र, ग्रामीण भागात विशेषत: शेतकर्‍यांपर्यंंंंत ही माहिती पोहोचावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तराहून पॅनकार्ड शिबिराचे आयोजन करुन तशी दवंडी गावात देण्याचे काम जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु करण्यात आले आहे.शेतकर्‍यांसाठी उपयुक्त निर्णयनोटाबंदीनंतर शेतकर्‍यांना आपल्या शेतमालाचा पैसा हा धनादेशाद्वारे देण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सदर धनादेश वटविण्यासाठी पॅनकार्ड नंबरची मागणी केली जाते. या निर्णयानंतर शेतकर्‍यांच्या आर्थिक व्यवहारातील अडचणी दूर होऊन सुलभता येईल.सदर निर्णयाची अंमलबजावणी २८ फेब्रुवारीपासून सर्वच बँकांमध्ये सुरू करण्यात आली आहे. नवीन खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक केले आहे. शिवाय जुन्या बँक खातेदारांकडूनही पॅनकार्ड नंबर मागितले जात आहेत.-विलास बावसकरबँक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, बुलडाणा