शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जिगाव धरणावर पलसोडा ग्रामस्थांचे उपोषण

By admin | Updated: April 22, 2016 02:23 IST

पुन्हा काम बंद; पुनर्वसन, नवीन भूसंपादन कायद्यानुसार हवा मोबदला.

सुहास वाघमारे / नांदुरा (जि. बुलडाणा)मागील तीन दशकांपासून रखडलेला व यावर्षी चार वेळा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे काम बंद पडलेल्या जिगाव प्रकल्पाच्या मातीभिंतीवर नांदुरा तालुक्यातील पलसोडा येथील सुमारे पन्नास प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मागण्यांसाठी २१ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरु केल्याने शेकडो वाहने, सातशे मजूर, यंत्रसामग्री अशी मोठी यंत्रणा ठप्प पडून आहे. त्यामुळे जिगाव प्रकल्पाचे काम बंद व प्रकल्पग्रस्तांची आंदोलने सुरु, असे चित्र प्रकल्पस्थळी आहे.आठ दिवसांपूर्वी आडोळ येथील प्रकल्पग्रस्तांनी जिगाव प्रकल्पाच्या गेटच्या पायाचे काम बंद पाडून आंदोलन केले. त्यानंतर जिगाव येथील प्रकल्पग्रस्तांनी २0 एप्रिल रोजी काम बंद पाडले व आता २१ एप्रिलच्या सकाळी पलसोडा येथील प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मागण्यांसाठी पाया बांधकामाजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे. पलसोडा येथील गजानन चांभारे, दिलीप पाटील, संजय चांभारे, गजानन धुळे, भानुदास इंगळे, रामेश्‍वर सुरळकार, सुधाकर सुरळकार, भगवान सुरळकार, सुधाकर गोरे, रघुनाथ तायडे, पुरुषोत्तम खुंडकर, सुलभा धुळे, सुभद्रा सुरळकार, सुमन सुरळकार, शेवंता कांडेलकर, बेबा झालटे, शोभा वावरे, देवका धुळे, गुंफा धुळे, यमुना सुरळकार यांच्यासह सुमारे पन्नास प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. पलसोडा येथील अतिक्रमकांची प्रत्यक्ष पाहणी करून संयुक्त मोजणी करावी. महिनाभरात मोजणी करून नवीन भूसंपादन कायद्यानुसार कलम अकरा लावण्यात यावी. अतिक्रमकांना नवीन गावठाणात पुनर्वसनांतर्गत प्लॉट देण्यात यावेत, आदी मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा प्रारंभ पलसोडा येथील प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. त्यांच्या या आमरण उपोषणामुळे प्रकल्पाचे पाया बांधकाम बंद पडले आहे.