शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अमडापूर येथील चावडी गेली चोरीला!

By admin | Updated: May 28, 2016 01:44 IST

शोध घेण्याची प्रशासनाकडे मागणी; ३ लाख ८३ हजारांची बांधली होती इमारत.

बुलडाणा : शासकीय अधिकारी, मामलेदार यांच्या सोयी बरोबरच गावाचा कारभार पाहण्यासाठी प्रत्येक गावाला पूर्वी चावडी असायची, आजही गावागावांत ही चावडी कायम आहे. मात्र अमडापूर येथील ही चावडीच चोरीला गेल्याची खळबळजनक माहिती येथील विजय उकर्डा भालेराव यांनी बाहेर काढली असून, ही चावडी शोधून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. इतर गावाप्रमाणेच अमडापूर येथेसुद्धा ग्रामपंचायतीला चावडी होती. मात्र ही चावडी कोठे आहे, हे गावाकर्‍यांना माहीत नाही. विशेष म्हणजे सन २00३-0४ या वर्षात अमडापूर येथील चावडीवर ३ लाख ८३ हजार रुपये शासनाने खर्च केल्याची बाब समोर आल्यानंतर येथील विजय उकर्डा भालेराव यांनी चावडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना गावात कोठेच चावडी दिसली नाही. अखेर त्यांनी माहितीच्या अधिकारात ग्रामपंचायतीला चावडीबद्दल माहिती मागितली. मात्र ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर सुद्धा चावडी आढळून आली नाही. दुसरीकडे मात्र शासनाच्या १९६२ हस्तांतरित टिपणीनुसार स्थानिक ग्रामपंचायतीच्या ताब्यात चावडी देण्यात आल्याची नोंद आहे. जर १९६२ च्या रेकॉर्डवर चावडी आहे, तर ग्रामपंचायतीच्या सातबार्‍यावर चावडीचा उल्लेख का नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. विजय भालेराव यांनी मागितलेल्या माहितीनुसार त्यांना ग्रामपंचायतीने स्वत:च्या मालकीच्या एकूण २९ मालमत्तेची माहिती दिली. यामध्ये शॉपिंग सेंटर, दुकान गाळे, सभागृह, ग्रामपंचायत कार्यालयाचा उल्लेख आहे, मात्र चावडीचा कोणत्याच सातबार्‍यामध्ये उल्लेख नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीची चावडी शोधून द्यावी, अशी मागणी भालेराव यांनी केली आहे.