शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात तिपटीने वाढला ऑक्सीनजचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 11:18 IST

रुग्णांची संख्या १०० च्या टप्प्यात आल्याने जिल्ह्यात ऑक्सीजनचा पुरवठा पुर्वीच्या तुलनेत तिपटीने वाढला आहे.

बुलडाणा: कोवीड-१९ रुग्णांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून ऑक्सीजनवरील रुग्णांची संख्या १०० च्या टप्प्यात आल्याने जिल्ह्यात ऑक्सीजनचा पुरवठा पुर्वीच्या तुलनेत तिपटीने वाढला आहे. एकट्या बुलडाणा येथील कोवीड सर्मित रुग्णालयामध्ये सरासरी ३८ रुग्ण हे ऑक्सीजनवर असून आगामी काळात जिल्ह्यात आॅक्सीजनची मागणी आणखी वाढणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत.कोवीड-१९ ची बाधा झालेल्या रुग्णांसाठी प्रतिबंधात्कम उपाययोजनांसोबतच आॅक्सीजन पुरवठा हा महत्त्वाचा उपाय असून रुग्ण बरा होण्यास त्याची भूमिका महत्त्वाची आहे. रुग्णाच्या शरीरातील ऑक्सीजन पातळी ही कायम राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. ती कमी झाल्यास रुग्णाच्या फुफ्फुसावर परिणाम करते व रुग्णाच्या व्याधीत वाढ होते. त्यामुळे प्राधान्याने रुग्णांना ऑक्सीजन दिल्या जात असून त्यामुळेच ऑक्सीजनची मागणी वाढली आहे. एकट्या बुलडाणा येथील कोवीड सर्मित रुग्णालयामध्ये दररोज १०० आॅक्सीजन सिलींडर लागत आहेत. दरम्यान, बुलडाणा, खामगाव, शेगाव, मलकापूर आणि देऊळगाव राजा येथे ऑक्सीजन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सध्या बुलडाणा आणि खामगाव येथे आॅक्सीजनवर असलेल्या रुग्णांची संख्या ही १०० च्या टप्प्यात आली आहे.

लिक्वीड ऑक्सीजन टँक उभारणारकोवीड रुग्णांना त्वरित आॅक्सीजन उपलब्ध व्हावा, या दृष्टीकोणातून सीएसआर फंडातून बुलडाणा येथील रुग्णालयात लिक्वीड आॅक्सीजन टँक उभारण्यात येणार आहे. ओएनजीसीसह अन्य काही कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस. यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. प्रत्येक जिल्हास्तरावर लिक्वीड ऑक्सीजन टँक उभारण्यात यावा, असे निर्देश राज्य शासनाने दिले असल्याची माहिती आहे.

दररोड दीडशे ऑक्सीजन सिलींरची गरजजिल्ह्यात सध्या दररोज दीडशे ऑक्सीजन सिलींडरची गरज असून त्याच्या अनुपातात काही सिलींडर राखीव ठेवावे लागत आहे. जेणे करून ऑक्सीजनचा तुडवडा भासणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. शेगाव येथील रुग्णालयात तुर्तास ऑक्सीजनवरील रुग्ण नाही तर मलकापूर व देऊळगाव राजा येथेही आता ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या