शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्याहून अधिक शेतकरी आत्महत्या अपात्र!

By admin | Updated: May 11, 2017 07:07 IST

एकूण १२५ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, यातील फक्त ५८ शेतकºयांच्या आत्महत्या शासकीय मदतीस पात्र ठरल्या.

नितीन निमकर्डे खामगाव : मागील तीन वर्षांत तालुक्यात एकूण १२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, यातील फक्त ५८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासकीय मदतीस पात्र ठरल्या. तब्बल ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुुंबांना मदत नाकारण्यात आली. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत मिळवून देण्याबाबत प्रशासकीय स्तरावर अनास्था दिसून येत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटांशी झुंज देत आहेत. २०१४ व २०१५ मधील खरीप हंगामात पाऊस कमी पडल्याने दुष्काळी परिस्थिती होती. शेतकऱ्यांना फारसे उत्पन्न मिळाले नाही. २०१६ मध्ये पाऊस बऱ्यापैकी होऊन उत्पादनातही मोठी वाढ झाली, पण तूर व अन्य शेतमालास भाव नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. सन २०१४ मध्ये तालुक्यात एकूण ३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी फक्त १८ शेतकऱ्यांची प्रकरणे शासकीय मदतीकरिता पात्र ठरविण्यात आली. सन २०१५ मध्ये ३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असता त्यातील २३ प्रकरणे मदतीस पात्र ठरली. सन २०१६ मध्ये सर्वाधिक ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील केवळ १३ शेतकऱ्यांची प्रकरणे मदतीस पात्र ठरविण्यात आली. सन २०१७ मध्ये आतापर्यंत १३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यातील फक्त चार मदतीस पात्र ठरल्या. अशा एकूण १२५ पैकी ५८ शेतकरी आत्महत्येची प्रकरणे मदतीस पात्र ठरली असून, ६७ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.