शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयातून मुदतबाह्य औषधांचे वितरण

By admin | Updated: September 22, 2016 01:32 IST

लोणार येथील ग्रामीण रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार.

लोणार (जि. बुलडाणा), दि. २१- येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता येणार्‍या रुग्णांना मुदत संपलेल्या औषधांचे वितरण करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याकडे लक्ष देऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नगरसेवक अब्दुल उबेद अब्दुल मुनाफ सह माहेश्‍वरी युवा संघटनेचे प्रदेश सचिव गोपाल तोष्णीवाल यांनी केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयाला सुरुवातीपासूनच अनेक समस्यांनी ग्रासले आहे. शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या या रुग्णालयात उपचाराकरिता येणार्‍या रुग्णांना पिण्याच्या पाण्याची सुविधादेखील रुग्णालयात उपलब्ध नाही. यानंतरही समस्यांनी आता कळसच गाठला आहे. चक्क कालबाह्य झालेल्या औषधांचे वितरण रुग्णांना करण्यात येत असल्याचे वास्तव समोर आल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. शहरा तील मुस्लीम समाजाच्या खैरुनीसाबी शे.यासीन ह्या २0 सप्टेंबर रोजी अंगात ताप असल्यामुळे तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात गेल्या असता, रुग्णालयातील स्टाफ नर्सने खैरुनीसा यांना शहानिशा न करता कालबाह्य झालेल्या औषधांचे वितरण केले. घरी गेल्यानंतर औषध घेण्यापूर्वी खैरुनिसा यांच्या मुलाने औषधांवरील मुदतीची तारीख त पासली असता सदर औषधांची मुदत संपल्याचे आढळून आले. ग्रामीण रुग्णालयातून कालबाह्य औषधांचे वितरण करून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचे समजले. या औषधीमुळे मोठा धोका होण्याची शक्यता आहे.

रुग्णालय समस्यांचे माहेरघर

     ग्रामीण रुग्णालयास अनेक समस्यांनी ग्रासले असून, उपचाराकरिता दुरुन रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. रुग्णांसाठी किंवा त्यांच्यासोबत येणार्‍या नातेवाईकांसाठी शिदोरी गृहाची सुविधा नाही. वेळेवर वैद्यकीय अधिकारी हजर राहत नाही. यामुळे रुग्णालयातील परिचारिकाच रुग्ण हाताळून औषधांचे वितरण करताना दिसून येतात. रुग्णालयात कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याने उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे. औषधांचा साठा असतानासुद्धा रुग्णांना कालबाह्य औषधांचे वितरण करण्यात येत आहे.