शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा शासनाने परिणामाला तयार रहावे- चटप

By admin | Updated: August 31, 2016 01:16 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या लढय़ाचे शेगावातून फुंकले रणशिंग.

खामगाव(जि. बुलडाणा), दि. ३0: स्वतंत्र विदर्भाच्या लढय़ाला ११८ वर्षांंंचा इतिहास आहे. शांततेच्या मार्गानेच विदर्भ राज्याची मागणी आतापर्यंंत होत आली आहे; मात्र शासनाने येत्या ३१ डिसेंबरपर्यंंंत याबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्यास, १ जानेवारीपासून तीव्र आंदोलनाच्या परिणामांना तयार रहावे, असा रोकठोक इशारा, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आ. अँड. वामनराव चटप यांनी येथे दिला.खामगाव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, स्वतंत्र विदर्भ राज्याच्या जागरासाठी शेगाव येथे ११ स प्टेंबर रोजी स्वतंत्र वर्‍हाड परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत सकाळी ११ वाजता नितीन रोंगे पावर प्रेझेंटेशनद्वारे विदर्भ राज्याची स्थिती, मेहकर येथील वसं त गिरी स्वतंत्र विदर्भ राज्याची लढाई यावर मार्गदर्शन करतील. तर अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अँड. वामनराव चटप, पोलीस महानिदेशक प्रवीण चक्रवती, रामभाऊ नेवले, अँड. नंदा पराते, डॉ. दीपक मुंढे, प्रदीप धामणकर, संध्या इंगोले, डॉ. रमेश गजबे, अरविंद देशमुख, अरुण केदार, अशोक राऊत मार्गदर्शन कर तील. ३१ डिसेंबरपर्यंंंत विदर्भ राज्याच्या जागरासाठी ५ दिंडी वेगवेगळ्या ठिकाणाहून काढण्यात येतील. या कालावधीत विदर्भ राज्याच्या बाबतीत शासनाने सकारात्मक भूमिका न जाहीर केल्यास, १ जानेवारीपासून उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही अँड. चटप यांनी यावेळी स्पष्ट केले.खामगावसह आठ जिल्ह्याला पाठिंबा!वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आग्रही आहे. त्याचवेळी खामगाव जिल्ह्यासह राज्यातील काटेल, पुसद, अचलपूर, दक्षिण गडचिरोलीसह आठ जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी आपला पाठिंबा असल्याचेही विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अँड. वामनराव चटप यांनी स्पष्ट केले.