शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय भाजीपाला उपयुक्त! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:46 IST

बुलडाणा :  शेतकर्‍यांचा शेतीमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार उपक्रम राबविण्यात येत आहे. या बाजाराच्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला ग्राहकांना मिळणार आहे. तरी नागरिकांनी या आठवडी बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी  केले.

ठळक मुद्देकृषी मंत्री फुंडकर यांचे प्रतिपादन शेतकरी आठवडी बाजाराच्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  शेतकर्‍यांचा शेतीमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार उपक्रम राबविण्यात येत आहे. या बाजाराच्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला ग्राहकांना मिळणार आहे. तरी नागरिकांनी या आठवडी बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी  केले.जयस्तंभ चौकस्थित नगरपालिकेच्या शाळा क्रमांक दोनच्या आवारात शेतकरी आठवडी  बाजाराचा उद्घाटनीय कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प. सभापती श्‍वेता महाले, माजी आमदार धृपदराव सावळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे,  कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जालींदर बुधवत, योगेंद्र गोडे, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, आत्माचे प्रकल्प संचालक नरेंद्र नाईक आदी उपस्थित होते.कृषी पणन कायद्यात दुरुस्ती करून शेतकरी आठवडी बाजारांना अधिकृत दर्जा मिळाला असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या शेतकरी आठवडी बाजारांमध्ये दलालांची साखळी नसणार आहे. त्यामुळे याचा लाभ थेट शेतकर्‍यांना मिळणार आहे. शेतकरी कृषी उत्पादक कंपन्यांचे बियाणे महामंडळाने खरेदी करण्यासाठी व बियाणे विक्रीस परवानगी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शेतकरी कृषी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतमाल उत्पादन, विपणनाचे मोठे काम जिल्ह्यात उभे राहिले आहे. या कंपन्यांच्या पाठीशी राज्याचा कृषी विभाग उभा आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी उत्पादक कंपनी फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश सुरडकर यांनी केले. आठवडी बाजाराचे फीत कापून सर्वप्रथम उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्यावतीने उभारण्यात आलेल्या भाजीपाला स्टॉलला भेट दिली. यावेळी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी भाजीपालासुद्धा खरेदी केला. तसेच शेतकर्‍यांची विचारपूस करून माहिती घेतली.  सदर बाजार दर बुधवारी दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान भरविल्या जाणार आहे. तरी नागरिकांनी बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे संचालन गोपाळ जाधव यांनी तर आभार अजय देशमुख यांनी मानले. याप्रसंगी बुलडाणा जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी, नगरपालिकेचे पदाधिकारी, शेतकरी बंधू, कंपन्यांचे संचालक आदींची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.