शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:31 IST

धामणगाव बढे ग्रामपंचायत सदस्यांचा उपोषणाचा इशारा धामणगाव बढे : गावामध्ये वीज वितरणसंदर्भात विविध समस्या असताना व वेळोवेळी त्यासंबंधीचे ...

धामणगाव बढे ग्रामपंचायत सदस्यांचा उपोषणाचा इशारा

धामणगाव बढे : गावामध्ये वीज वितरणसंदर्भात विविध समस्या असताना व वेळोवेळी त्यासंबंधीचे निवेदन देऊनही त्याची दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे त्रस्त होऊन ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी वीज वितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे .

धामणगाव बढे येथे कनिष्ठ अभियंत्यांसह वीज कर्मचारी गावांमध्ये हजर राहत नाहीत. त्यामुळे नागरिकांना स्वतःच्या जीवावर उदार होऊन अनेक वेळा कामे स्वतः करावी लागतात. त्यामुळे वीज कर्मचारी फक्त नागरिकांना धमकावून वीजवसुलीसाठीच आहेत का, असा प्रश्न आता पडला आहे. याबाबत वरिष्ठांना कळवूनसुद्धा कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे फोनसुद्धा वीज कर्मचारी घेत नाही. पटेल कब्रस्तानजवळच्या रस्त्यावरील विजेचा पोल तिरपा झालेला आहे व कधीही पडू शकतो. त्यामुळे जीवितहानी सुद्धा होऊ शकते. याबाबतची तक्रार करूनसुद्धा येथील कनिष्ठ उपअभियंता त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. भैरवनाथ मंदिराजवळील राेहित्रावर अधिकचा लोड झाल्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार याबाबत संबंधितांना कळविलेले आहे, तरी त्याची दखल घेतली जात नाही. बडा मोहल्ला कब्रस्तानच्या आतमध्ये विद्युततारा तुटून जमिनीवर पडले आहे व एक पोल तिरपा झालेला आहे. याबाबतसुद्धा तक्रार करून त्याची दखल घेतली जात नाही. गावाच्या समस्यांबाबत तत्काळ दखल घेण्यात येऊन त्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य ॲड. वसीम कुरेशी, रशिद पटेल, शेख सादिक शेख रशीद, जमीर कुरेशी यांच्यासह नागरिकांनी निवेदनाद्वारे उपोषण व आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे कार्यालयीन वेळेतसुद्धा निवेदन स्वीकारण्यासाठी येथील कनिष्ठ अभियंत्यासह कोणताही वीज कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे येथील वीज वितरण कार्यालयाचा कारभार नागरिकांसाठी किती त्रासदायक आहे हे स्पष्ट होते. येथील कनिष्ठ अभियंत्यासह वीज कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी विविध तक्रारी असतानासुद्धा व अनियमितता असतानासुद्धा वरिष्ठ अधिकारी याची दखल का घेत नाही, हा खरा प्रश्न नागरिकांकडे पडला आहे.