शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

..तर मकोका अंतर्गत कारवाई!

By admin | Updated: November 23, 2015 01:22 IST

वाहतूक कंत्राटदाराकडून होणार पाच लाख रुपयांची वसुली; ईसी अँक्ट अंतर्गत कारवाई.

बुलडाणा : सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य खुल्या बाजारात नेताना पोलिसांनी पकडलेल्या वाहतूक कंत्राटदारावर सार्वजनिक वितरण प्रणाली कायदा (ईसी अँक्ट ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. यावर जिल्हाधिकार्‍यांनी सुनावणी घेतली असून, गुन्हा सिद्ध झाल्यास वाहतूक ठेकेदारावर मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी शिफारस पुरवठा विभागाने शासनाकडे केली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीतील गहू आणि तांदूळ खामगाव येथील गोदामातून मलकापूर तालुक्यासाठी नेताना दोन ट्रक धान्य गोडाउनला न जाता, ते परस्पर खुल्या बाजारात विक्रीस जात असताना पोलिसांनी हे ट्रक पकडले होते. १२ आणि १३ ऑक्टोबरच्या रात्री वाहतूक कंत्राटदाराचे ट्रक क्रमांक एमपी - ९ केए - ८१६६ मध्ये तांदळाचे ३00 कट्टे, तर ट्रक क्रमांक एमएच २८ - बी - ७00६ मध्ये गव्हाचे ३00 कट्टे खामगाव येथील गोदामातून भरण्यात आले होते. हे धान्य मलकापूर येथील शासकीय गोदाममध्ये साठवायचे होते. खामगाव येथील गोदामाहून निघालेले धान्य मलकापूरच्या गोदामात पोहोचेपर्यंंत या धान्याची जबाबदारी संबंधित वाहतूक कंत्राटदाराची असते. खामगावहून धान्याची उचल करून मलकापूरकडे निघालेले हे दोन्ही ट्रक मलकापूरच्या गोदामावर न जाता, त्यापासून पंधरा किमीपेक्षाही अधिक अंतरावर पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी चौकशी केली असता, या ट्रकमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी हे दोन्ही ट्रक ठाण्यात जमा करून चौकशी केली असता, सदर धान्य हे खुल्या बाजारात विक्रीस नेत असल्याचे निष्पन्न झाले.