शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदली निर्णयाला शालेय व्यवस्थापन समित्यांचा विरोध

By admin | Updated: May 29, 2017 19:18 IST

बुलडणा : राज्यातील जिल्हापरिषद शिक्षकांच्या बहुतांश बदल्या होणार आहे. मोठ्या प्रमाणात बदल्या होणार असल्यामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्था चांगलीच प्रभावित होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडणा  : राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने अलीकडेच प्राथमिक शिक्षकांच्या  बदलीचा सुधारित आदेश निर्गमित केला आहे. २७ फेब्रुवारी २०१७ च्या नव्या आदेशानुसार राज्यातील जिल्हापरिषद शिक्षकांच्या बहुतांश बदल्या होणार आहे. यापुढे  दरवर्षी शिक्षकांच्या मोठ्या  प्रमाणात बदल्या होणार असल्यामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्था चांगलीच प्रभावित होणार आहे.शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांच्या झपाटयाने होणाऱ्या शैक्षणिक प्रगतीला,विद्यार्थी गुणवत्तेला लोकसहभागातून सुरू असलेल्या डिजिटल शाळा उपक्रमाला तसेच वाढत्या पटसंख्येला धोका निर्माण होणार असल्याचे लक्षात येताच चिखली तालुक्यातील जवळपास चाळीस ते पन्नास शालेय व्यवस्थापन समित्यांनी ठराव घेऊन एकमताने या शासन निर्णयाला विरोध दर्शविला असून तसे लेखी निवेदन पंचायत समिती सभापती यांच्याकडे दिले आहे सदर ठरावामध्ये शासनाचा हा निर्णय ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचा कणा मोडणारा असून शिक्षकांच्या अश्या प्रकारच्या दरवर्षी होणाऱ्याा बदल्या ग्रामीण शिक्षण व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करू शकतात, असे नमूद करण्यात आले आहे. अलीकडेच  जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारत चालला आहे, शाळेतही प्रत्येक वर्ग डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. गावोगावी शिक्षकांनी लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांच्या मदतीने व स्वत:चे देखील योगदान यामध्ये समाविष्ट करून शाळेचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प केला आहे. शाळांची पटसंख्या वाढवावी या हेतूने रंगरंगोटी बाग बगीचा ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती वापरून, सेमी इंग्रजी वर्ग इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र यासाठी शालेय शिक्षण विभागाचे आवाहन प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पूर्ण करण्यासाठी गावकरी व शिक्षक धडपडत आहे, परंतु शासनाच्या या बदली धोरणामुळे सगळीकडे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे .शासनाच्या या निर्णयामुळे  शिक्षक एकमेकाला खो-खो देऊन मोठ्या प्रमाणात बदल्या होऊ शकतात व शाळावरील संपूर्ण स्टाफ बदलू शकतो. याचा निश्चित जिल्हा परिषद शाळांचा प्रगतीवर विपरीत परिणाम होऊन भविष्यात ह्या शाळा बंद पडतील, अशी भीती निर्माण झाली आहे. तेव्हा कुठल्याही परिस्थितीत या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.