शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

स्वकीयांना सांभाळत विरोधकांना गळाला लावण्याची कसरत

By admin | Updated: October 5, 2014 23:44 IST

बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू.

बुलडाणा : स्वबळाची ताकद अजमाविण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या पैलवानांना आता दुप्पट ताकदीने कसरत करावी लागत आहे. सर्वच मतदारसंघात हो त असलेल्या पंचकोनी लढतीमुळे उमेदवारांपुढे पेच निर्माण झाला असून, स्वकीयांची नाराजी सांभाळत विरोधकांना गळाला लावण्याचे प्रयत्न जोमाने सुरू झाले आहेत. बुलडाणा, मलकापूर, मेहकर व चिखली या मतदार संघात विशेष करून उमेदवारीवरून स्वकीयांवर नाराज झालेली मंडळीच या निवडणुकीत स्वताला ह्यहुकमी एक्केह्ण ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पडद्याआडच्या राजकारणात त्यांची भूमिका अधिकच महत्त्वाची मानली जात आहे. आघाडी व युती दुभंगल्याने दोन्ही पक्षात अनेकांना संधी मिळाली असली, तरी जागा एक व इच्छुक अनेक असल्याने मोठया प्रमाणावर नाराजीही व्यक्त होऊ लागली. अशा परिस्थितीत बहुरंगी लढतीत स्वकीयांतील नाराजांबरोबरच विरोधकातील नाराजांवर निवडणुकीच्या यशाचे गणित अवलंबून असल्याने व तीच डोकेदुखी असल्याने अधिकृत उमेदवारांनी त्याकडे गांभीर्याने घेण्यासाठी सुरूवात केली आहे. स्वकीयांची नाराजी पक्षाचे नेते काढतील असे गृहीत धरून विरोधी पक्षातील नाराजांना गळ टाकला जात आहे. त्यांची नाराजी मतांमध्ये परिवर्तन व्हावी, यासाठी थेट नाराजांशी न बोलता, दिवसातील उजेडाऐवजी त्यांच्या जवळच्या सहकार्‍यांकरवी ह्यसमेटह्ण घडविण्यासाठी सुरूवात केली आहे. यासाठी रात्रीचा अंधारच अधिक प्रभावी ठरू लागला आहे. त्यात राजकीय डावपेच व व्युहरचना आखले जात आहेत. निवडणूक रिंगणातील जवळपास सर्वच उमेदवारांनी अशा प्रकारच्या छुप्या तडजोडींना प्राधान्य देत त्यातून निवडणूक सोपी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.