शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

‘सौर कृषी पंप’ योजनेतून उत्पन्न वाढीची संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 14:19 IST

सध्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हयातील २३१० शेतकरी अटक कृषी पंप योजनेचा लाभ घेत आहेत.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: महाविकास आघाडी सरकारने जाहिर केलेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात सौर कृषी पंपासाठी दहा हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता विजेवर अवलंबून रहावे लागणार नसून सौर उर्जेद्वारे शेतीच्या उत्पन्नात वाढ करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हयातील २३१० शेतकरी अटक कृषी पंप योजनेचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी महाआघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे शेतकºयांकडून स्वागत होत आहे.ज्या शेतकºयांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे तसेच ज्या शेतकºयांनी यापूर्वी कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे अशा शेतकºयाना अटल सौर कृषीपंप योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत प्राधान्य दिल्याने परिमंडळातील ५ हजार ६१८ शेतकºयांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवगार्तील लाभार्थ्यांना ३ एचपीसाठी १६ हजार ५६० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना ८ हजार २८० रुपये (५ टक्के), तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवगार्तील लाभार्थ्यांना २४ हजार ७१० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना १२ हजार ३५५ रुपये (५ टक्के) एवढी रक्कम भरायची होती. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी अकोला परिमंडळाअंतर्गत असणाºया अकोला जिल्ह्यातील ज्या शेतकºयांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे.त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ६१३ आणि दुसऱ्या टप्यातील ३७ शेतकºयांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकºयांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे . त्यापैकी पहिल्या टप्यातील ४०९ आणि दुसऱ्या टप्यातील ५०३ शेतकºयांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आले आहे, तर वाशिम जिल्हयातील ज्या शेतकºयांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली होती त्यापैकी पहिल्या टप्यात १४२१ आणि दुसºया आणि तिसºया टप्यात ३२५ अशी परिमंडळातील एकून ३३८० शेतकºयांच्या शेतात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत.

‘अटल कृषी पंप’चा २३१० ग्राहकांनी घेतला लाभयापूर्वी राबविण्यात आलेल्या अटल सौर कृषीपंप योजनेत परिमंडळाअंतर्गत असणाऱ्या अकोला जिल्हयात ५७७, बुलढाणा ८४१ आणि वाशिम जिल्हयात ८९२ सौर कृषीपंप असे परिमंडळातील तीनही जिल्हयात एकून २३१० सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत.

टॅग्स :khamgaonखामगाव