शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी भरते उघड्यावर

By admin | Updated: July 3, 2017 01:14 IST

पालक चायगाव येथील अंगणवाडीवर टाकणार बहिष्कार!

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. ग्रामीण भागात सुरू असलेल्या अनेक अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्या नसल्याने अनेक अंगणवाड्या उघड्यावर भरत असल्याने बालकांना त्रास सहन करावा लागत आहे. चायगाव येथील अंगणवाडी क्रमांक दोनला स्वतंत्र खोली नसल्याने या अंगणवाडीतील मुले उघड्यावर तर कधी झाडाखाली बसत असल्याने मुलांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. येत्या १५ दिवसात मुलांना सुविधा न दिल्यास अंगणवाडीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.शासनाने ग्रामीण भागातील ० ते ५ वयोगटातील मुला-मुलींसाठी प्रत्येक खेडेगावात अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. शासनाकडून या अंगणवाडीतील मुलांना सुविधा मिळावी, यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहेत. तर प्रत्येक अंगणवाडीला स्वतंत्र खोल्या असल्या पाहिजेत, यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे; परंतु स्थानिक अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्या नसल्याने मुले चावडीमध्ये, झाडाखाली तर कधी उघड्यावर बसत आहे. त्यामुळे मुलांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने अनेक गावासाठी स्वतंत्र खोल्या बांधकामासाठी निधी मंजूर केलेला आहे; परंतु स्थानिक पंचायत समिती अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे नवीन अंगणवाडी स्वतंत्र खोल्यांचे बांधकाम रखडले आहे. चायगाव येथे अंगणवाडी क्रमांक २ साठी स्वतंत्र खोली बांधकाम मंजूर झालेले आहे. स्वतंत्र खोली बांधकामासाठी जागासुद्धा उपलब्ध आहे. त्यासाठी ग्रा.पं. च्यावतीने ठराव घेण्यात आला आहे; मात्र तरीही बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही. या अंगणवाडीतील मुले जिल्हा परिषद शाळेच्या आवारात तर कधी झाडाखाली बसतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने मुलांना त्रास होत आहे. निधी मंजूर असूनही केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे काम रखडले आहे.मुलांना अंगणवाडीत न पाठविण्याचा पालकांचा इशाराचायगाव येथील अंगणवाडी क्रमांक २ ला स्वतंत्र खोली बांधकामासाठी निधी मंजूर झालेला आहे. ग्रा.पं.चा ठराव आहे. खोली बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे; मात्र तरीही केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खोली बांधकाम रखडले आहे. स्वतंत्र खोली नसल्याने मुले ही झाडाखाली तर कधी शाळेच्या आवारात बसतात. त्यामुळे मुलांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. येत्या १५ दिवसात मुलांना सुविधा न दिल्यास अंगणवाडीत मुलांना पाठविणार नाही. तसेच अंगणवाडीवर बहिष्कार टाकू, असा इशारा भास्करराव देशमुख, वसंतराव सरोदे, लिंबाजी देशमुख, रमेश राठोड, राजू चव्हाण, रवी राठोड, लिंबाजी राठोड, उकंडा आडे, गणेश आडे, रमेश आडे, अरविंद आडे, शिवाजी मोरे, कडूबा बोरकर, गजानन बोरकर, गजानन पिछोरे, कुंडलीक देशमुख, अशोक आडे, भीमराव चव्हाण, रामेश्वर राठोड, कालीम अंभोरे, देवीदास सास्ते, उत्तम मोरे, सुभाष देशमुख, संतोष सहाने, सुधीर मोरे आदींनी दिला आहे.