शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

झाडे जगली तरच मिळणार कंत्राटदाराला रक्कम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 01:08 IST

खामगाव पालिकेचा ऐतिहासिक निर्णय

अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: लावलेली किमान ८० टक्के झाडे जगली तरच कंत्राटदाराला देयक देण्याचा ऐतिहासिक ठराव खामगाव नगरपालिकेने घेतला आहे. वृक्षारोपणासोबतच झाडे जगविण्याची काळजी घेण्यासाठी असा ठराव घेणारी ही पालिका राज्यात पहिलीच असावी. खामगाव नगरपालिकेची विशेष सभा ५ जुलै रोजी पार पडली. यावेळी विविध विषयांवरील ठराव बहुमताने पारित करण्यात आले. यामध्ये वृक्षारोपणाबाबतही ऐतिहासिक ठराव घेण्यात आला. या ठरावानुसार शहरात शासनाच्या ‘एकच लक्ष्य चार कोटी वृक्ष’ या ध्येयानुसार वृक्षारोपण मोहीम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच वृक्षारोपण केल्यानंतर लावलेली झाडे जगविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा अनुभव असून, यात शासनाचा पैसा पाण्यात जात आहे. त्यामुळे लावलेली झाडे जगली तरच संबंधित कंत्राटदाराला तीन वर्षानंतर देयक अदा करण्याची अट घालावी असे ठरले. तसा ठरावही बहुमताने पारित करण्यात आला. पालिकेचा हा ठराव वृक्षलागवडीसोबतच झाडे जगविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, शहर हिरवे बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल या माध्यमातून उचललेले गेलेले आहे. तर असा ठराव घेणारी खामगाव पालिका ही राज्यातील पहिली नगरपालिका असावी, असे म्हटले जात आहे. दरम्यान, या ठरावाला तांत्रिक मान्यता देण्यात आली असून, येत्या काही दिवसांमध्ये उद्दिष्टानुसार वृक्ष लागवड केली जाणार आहे.६ ते ७ फुटांच्या रोपांची होणार लागवड!नगरपालिकेच्या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत ६ ते ७ फूट वाढलेल्या रोपांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे ही रोपे जगण्याची शक्यता जास्तचे राहील; परंतु नियमित पाणी देणे व नीगा राखण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारास पार पाडावी लागेल. तीन वर्षापर्यंत संरक्षक कठडे बसवून व्यवस्थित झाडे जगविली तरच कंत्राटदाराला त्याच्या कामाचा मोबदला मिळेल. त्यामुळे झाडे जगविण्याकडे कंत्राटदार विशेष लक्ष पुरविणार यात शंकाच नाही.प्रत्येक नगरसेवकास १०० झाडांचे लक्ष्यसदर वृक्षारोपण मोहिमेंर्तगत प्रत्येक नगरसेवकास वैयक्तिकरित्या १०० झाडे लावून जगविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाने आपले उद्दिष्ट पूर्ण केल्यास ३५ नगरसेवकांच्या माध्यमातून ३५०० झाडे लागू शकतात. १०० झाडे लावण्याची व जगविण्याची ही जबाबदारी कोण-कोण पूर्ण करणार याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागणार आहे.