शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सानुग्रह अनुदानासाठी केवळ ३३५ ऑटोरिक्षाचालक पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 11:47 IST

Khamgaon News : सानुग्रह अनुदानासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ ३३५ ऑटोरिक्षाचालक पात्र ठरले आहेत.

- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाकडून देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांच्या सानुग्रह अनुदानासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ ३३५ ऑटोरिक्षाचालक पात्र ठरले आहेत. इतर अर्ज विविध त्रुटींमुळे अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्रुटींची पूर्तता केल्यानंतर नव्याने अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.राज्यभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने शासनाने फेब्रुवारीच्या शेवटच्या टाळेबंदी जाहीर केली होती. यामुळे ऑटोरिक्षाचालकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. या परिस्थितीतून सावरण्यासाठी राज्य शासनाने त्यांना १५०० रुपयांचे एक वेळचे अर्थसाहाय्य देण्याची योजना जाहीर केलेली आहे. या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला २२ मेपासून सुरुवात झाली असून, याकरिता ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ६४९ रिक्षाचालकांनी अर्ज केले आहेत. यापैकी ३३५ अर्ज पात्र, तर ३१४ अर्ज अपात्र ठरविण्यात आले. पात्र लाभार्थींमध्ये परमिटची वैधता १६ डिसेंबर २०१५ पासून आजपर्यंत असलेले तर अपात्र असलेल्यांमध्ये लायसन क्रमांक, परमिट क्रमांकांचा उल्लेख नसलेले, आधार क्रमांक व लायसन क्रमांकावरील जन्मतारीख वेगवेगळी नमूद असलेल्या अर्जांचा समावेश आहे. असे अर्ज तात्पुरते अपात्र ठरविण्यात आले आहेत. याउलट खासगी वाहनधारक, मूळमालकाच्या नावाने नसलेेले, मालवाहू वाहनधारक व परमिटची वैधता संपलेले अर्ज कायस्वरूपी अपात्र ठरविण्यात आले आहेत. आतापर्यंत अर्ज न केलेल्या ऑटोरिक्षाचालकांनी ऑनलाइन अर्ज सादर करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा