शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सातबारा, आठ अ मध्ये प्रचंड चुका !

By admin | Updated: June 13, 2017 19:54 IST

संगणकीकृत दस्तावेज बनले डोकेदुखी

संदीप गावंडेलोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा :सद्यस्थितीत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संगणकीकरणाचे काम झालेले आहे. मात्र जुन्या दस्तावेजांचे संगणकीकरण करताना मोठ्या प्रमाणात चुका होत असून आॅनलाईन सातबारा व आठ अ मध्ये मोठे घोळ होताना दिसत आहेत. शेतकऱ्यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.शासकीय कार्यालयांमध्ये परंपरागत हस्तलिखीताची पध्दत सोडून नवीन संगणकीकरणाची आॅनलाईन पध्दती स्वीकारली. सर्व सेवा अचूक, वेळेत व पारदर्शी पध्दतीने व्हाव्यात हा यामागचा उद्देश होता. परंतु जुन्या दस्तावेजांचे संगणकीकरण करताना कर्मचाऱ्यांकडून झालेल्या चुकांचा फटका आता नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामध्ये प्रामख्याने सातबारा व आठ अ मध्ये मोठ्या प्रमाणात चुका झालेल्या दिसतात. क्षेत्रफळ कमी-जास्त, नावात चुका, सात-बारा योग्य असला तरी आठ अ मधील एकूण क्षेत्रफळात तफावत असणे, वर्ग १ ची जमीन वर्ग २ ची दाखविणे, जुने परतफेड केलेले कर्ज सातबारावर कायम ठेवणे अशा अनेक चुका या आॅनलाईन सातबारा व आठ अ मध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेताना किंवा विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सदर कागदपत्रांमधील त्रुटी वेळीच दूर करण्याची गरज निर्माण झालेली आहे, एवढे मात्र खरे!