शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिकेची ऑनलाइन सभा ‘ऑफलाइन’ गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 12:29 IST

Khamgaon Municipal council ऑनलाइन आणि ऑफलाइनच्या कचाट्यात सापडलेल्या सभेत शुक्रवारी दोन विषयांना मंजुरी देण्यात आ

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक नगरपालिकेत आयोजित ऑफलाइनसभा रद्दकरूनऑनलाइन घेण्यात आली. मात्र, सभा होण्यापूर्वीच तक्रारीमुळे चर्चेत आलेली ही सभा ऑनलाइन झाल्यानंतरही ऑफलाइन अधिकच गाजली. ऑनलाइन आणि ऑफलाइनच्या कचाट्यात सापडलेल्या सभेत शुक्रवारी दोन विषयांना मंजुरी देण्यात आली.शहरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यासाठी नगराध्यक्षा अनिता डवरे यांच्या स्वाक्षरीने खामगाव पालिकेची ऑफलाइन विशेष सभा शुक्रवार २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रकोपामुळे ही ऑफलाइन सभा रद्द करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष सरस्वती खासणे आणि काँग्रेस नगरसेवकांनी केली. सभा झाल्यास कोविड-१९ आपत्ती व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन होणार असल्याचा मुद्दाही जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत काँग्रेस नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी ऑफलाइन सभा रद्द करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर गुरूवारी नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीने शुध्दीपत्रक देत शुक्रवारी ऑनलाइन सभा घेण्यात आली. यामध्ये विषय सुचीवर ०३ सप्टेंबर २०२० च्या सभेचे इतिवृत्त कायम करणे, वैशिष्ट्येपूर्ण अनुदान योजना २०१८-१९ अंतर्गत प्राप्त शासनाच्या पत्रावर विचार विनिमय करून निर्णय घेणे, नगरोत्थान योजना  अंतर्गत विचार विनिमय करून निर्णय घेणे हे प्रमुख तीन विषय होते.

सभा तांत्रिक कचाट्यात!ऑफलाइन सभा रद्द करून ऐनवेळी ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय म्हणजे सत्ताधाºयाचा आततायीपणा आहे. सोयीनुसार ठराव घेण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली. शुध्दीपत्रक देत, सभा घेणे कायदेशीर नसल्याची ओरड विरोधी सदस्यांकडून आता केली जात आहे. या सभेबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे विरोधी सदस्यांनी स्पष्ट केले.

म्युट आणि एक्झीटचा खेळ!स्थानिक नगर पालिकेच्या सभेत शुक्रवारी म्युट आणि एक्झीटचाही खेळ काही वेळ रंगला. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी विरोधी सदस्यांना सभेत बोलण्याचा अधिकार नाकारण्यात आला. तर काही सदस्यांना जाणीवपूर्वक एक्झीट करण्यात आल्याचा दावा विरोधी सदस्यांकडून केला जात आहे. यासंदर्भात विरोधी सदस्यांनी शुक्रवारी दुपारी मुख्याधिकाºयांकडे तक्रारही दाखल केली.

खामगाव पालिकेतील विरोधी सदस्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाºयांनी ऑफलाइन सभा रद्द करण्याचे निर्देश दिले. शुक्रवारी खामगाव पालिकेत ऑनलाइन सभा घेण्यात आली. कोरोना उपाययोजनेचे सर्वच निकष सभेत पाळण्यात आले.- मनोहर अकोटकरमुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.

विरोधी सदस्यांचा आवाज दाबण्यासाठीच ऑनलाइन सभा घेण्यात आली. या सभेला कोणताही तांत्रिक आधार नाही. संख्याबळाच्या जोरावर सभेत दोन विषय पारित करण्यात आले. यामध्ये एक विषय न्यायप्रविष्ठ असतानाही विषय सूचीवर ठेवण्यात आला.- अमेयकुमार सानंदागटनेता कॉग्रेस, नगर परिषद, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगाव