शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वनविभाग बनविणार झाडांची माहिती असलेली "आॅनलाईन लायब्ररी"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 19:49 IST

व्हॉट्स अप, फेसबूकसह सोशल मिडीयावरही टाकणार झाडांची माहिती

ऑनलाइन लोकमत

विवेक चांदूरकर / बुलडाणा

जंगलातील विविध वृक्षांची ओळख व्हावी. औषधीयुक्त वृक्षांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, तसेच या माध्यमातून दुर्मिळ वृक्षांचे जतन व्हावे, याकरिता वनविभागाच्यावतीने आॅनलाईन लायब्ररी तयार करण्यात येणार आहे. या लायब्ररीमध्ये सर्वच प्रकारच्या वृक्षांची माहिती व त्याचे महत्व राहणार आहे.राज्यातील वनामध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, वृक्ष, विविध प्रकारचे गवत आहे. यापैकी काही वनस्पती दुर्मिळ तर काही औषधीयुक्त आहे. मात्र त्याची माहिती अनेकांना नाही. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही जंगलातील सर्व वनस्पती व वृक्षांची माहिती नसते. परिणामी योग्यप्रकारे संवर्धन करण्यात येत नाही. त्यामुळे सर्वांना वृक्षांसंबंधीची माहिती व्हावी, याकरिता आॅनलाईन लायब्ररी तयार करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. यानुसार जंगलात काम करणारे मजूर किंवा कर्मचारी जंगलात असलेल्या विविध वृक्षांचे, वनस्पतींचे फोटो काढून आणणार आहेत. एकाच झाडाचे चहूबाजुने, तसेच पानांचे खोडाचे, फुलांचे छायाचित्र काढण्यात येईल. वर्षाच्या वेगवेगळ्या कालखंडात झाडांचे फोटो काढण्यात येणार आहे. त्यानंतर सदर छायाचित्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात येईल.  त्यानंतर झाडांचे छायाचित्र व माहितीसह लायब्ररी तयार करण्यात येईल. यामध्ये झाडाच्या शास्त्रीय नावापासून तर गुणधर्म कोणते आहेत, कोणत्या ऋतूमध्ये फुले व फळे येतात, याचीही माहिती राहणार आहे. ही लायब्ररी पुर्णता आॅनलाईन असणार आहे.सोशल मिडीयावर राहणार झाडांची माहितीलायब्ररीमध्ये असलेल्या झाडांची माहिती वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप गृपवरही टाकण्यात येणार आहे. ज्या भागात जी झाडे आहेत. त्या भागातील कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्स अप गृपवर सदर माहिती टाकण्यात येईल. त्यामुळे झाडे ओळखणे सहज सोपे होणार आहे. तसेच फेसबूकवर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनाच आपल्या भागातील झाडे व त्यांचेमहत्व कळू शकणार आहे. नव्या अधिकाऱ्यांना मिळेल माहितीवनविभागामध्ये अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असतात. नव्याने बदलून आलेल्या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या जंगलातील झाडांची माहिती व्हायला वेळ लागतो. या लायब्ररीमळे अधिकाऱ्यांना कमी वेळात झाडांची परिपूर्ण माहिती मिळणार आहे. तसेच वनविभागात नव्याने रूजू होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही त्वरीत झाडांची संपूर्ण माहिती मिळणार आहे.