शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन सातबारा, फेरफारला स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:20 IST

शेतक-यांच्या तलाठी कार्यालयाच्या वा-या थांबणार!

ठळक मुद्दे५ लाख ४० हजार दस्तावेजांचे संगणकीकरण

ब्रह्मानंद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शेतकºयांना सातबारा, फेरफार आदी कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालयात चकरा मराव्या लागत होत्या. त्यासाठी डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन अंतर्गत जिल्ह्यात एकूण ५ लाख ४० हजार ५५७ सातबारे आॅनलाइन करण्यात आले आहेत. प्रशासकीय स्तरावरून आॅनलाइन सातबारा व फेरफार १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर सुरू करण्यात येणार असून, शेतकºयांच्या तलाठी कार्यालयाच्या वाºया आता बंद होणार आहेत.शेतकºयांना विविध कामांसाठी सातबारा व फेरफारची गरज भासते; मात्र प्रत्येक वेळेस सातबारा व फेरफार काढण्यासाठी शेतकºयांना तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. काही ठिकाणी तर प्रभारी असलेला तलाठी हा गावात येतच नसल्याने गावकºयांना अनेक वेळा तलाठ्याची वाट पाहावी लागते, अशा वेळेस शेतकºयांना त्यांचा सातबारा वेळेवर मिळत नसल्याने त्यांची कामे खोळंबतात. त्यामुळे शेतकºयांना वेळेवर सातबारा फेरफार उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाच्यावतीने डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोगाम  सुरू केला आहे. या प्रोग्रामाच्या माध्यमातून शेतकºयांना आॅनलाइन सात बार, फेरफार उपलब्ध करून देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोगाम अंतर्गत शेतकºयांना शेतीविषयक सर्व रेकॉर्ड आॅनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई-फेरफार, ई-चावडी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार ई-फेरफार आज्ञावलीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या दस्ताची नोंद तलाठी रेकॉर्डला आॅनलाइन करण्यात येत आहे. या प्रोग्राम अंतर्गत शेताविषयक तलाठी रेकॉर्डला असलेले १ ते २१ गाव नमुने आॅनलाइन अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ५ लाख ४० हजार ५५७ सातबारे आॅनलाइन करण्यात आले आहेत.प्रशासकीय स्तरावरून आॅनलाइन सातबारा व फेरफार देण्याचा मुहूर्त १५ आॅगस्ट ठेवण्यात आला आहे. सातबारा वेळेवर म् िमिळण्यासाठी हा आॅनलाइन प्रणाली अत्यंत महत्त्वाचीआहे; मात्र या प्रणालीचा लाभ घेताना शेतकºयांना इंटरनेट कनेक्टिव्हीटीच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.