शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार नागरिकांना विंचू दंश

By admin | Updated: April 27, 2017 00:17 IST

वर्षभरातील घटना : ग्रामीण भागात धोका जास्त

बुलडाणा: आरोग्य विभागाला जसे साथींच्या आजारावर आणि इतर काही रोगांवर सर्वेक्षण करून उपचार करावे लागतात. तसेच ग्रामीण भागातील परिसरात होणाऱ्या विंचू दंश, श्वानदंश व सर्पदंश अशा रुग्णांवर वेळेत उपचार करून रुग्णांचा जीव वाचवावा लागतो. गेल्या एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या बारा महिन्यात जिल्ह्याभरात १०२४ लोकांना विंचू दंश झाल्याच्या घटना घडल्या; मात्र एकही रुग्ण दगावला नसल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत प्राप्त झाली आहे.एप्रिल, मे आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये विंचू डंक मारण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. ग्रामीण भागात विशेषत: एप्रिल व मे महिन्यामध्ये उष्ण वातावरणामुळे रात्रीचे विंचू बाहेर पडतात, तर हिवाळ्यात बऱ्याच अडगळीत विंचू दबा धरुन बसलेले असतात. त्यामुळे याकाळात विंचू दंशाचे प्रमाण वाढते. यामुळे घरकाम व शेतीचे काम करताना बऱ्याचवेळा विंचू दंश होण्याचे प्रमाण जास्त आहे.जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय व १२ ग्रामीण रुग्णालयात गत वर्षभरात विंचू दंशाचे १०२४ रुग्ण नोंदविण्यात आली. यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ५६० एवढी जास्त आढळून आली. या दंशावरती आरोग्य विभागात औषध उपचार उपलब्ध असल्याने या रुग्णांवरती तातडीने उपचार करुन संभाव्य धोका टाळण्यात आला.वर्षभरात झालेल्या विंचू दंशांची नोंदबुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात १६० विंचू दंश रुग्ण तर खामगाव सामान्य रुग्णालयात १९३ नोंद आहे. उपजिल्हा रुग्णालय शेगावमध्ये ८५, मलकापूरमध्ये ९ रुग्णांची नोंद आहे. तर चिखली ग्रामीण रुग्णालयात १६९, दे.मही ११०, देऊळगावराजामध्ये ७०, सिंदखेडराजामध्ये ७०, बिबी ११, लोणार १२, लाखनवाडा १३, वरवट बकाल २८, ज.जमोद ३४, मोताळा २१ आणि धाड ग्रामीण रुग्णालयात २८ रुग्ण अशी एकूण १०२४ विंचू दंश रुग्णांची नोंद बारा महिन्यात करण्यात आली.विंचू व सर्प दंश झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांनी अशा प्रकारचे प्रथम आपल्या जवळच्या आरोग्य विभागात संपर्क साधून उपचार घ्यावात, वैद्यकीय उपचार घेण्यास उशीर झाल्यास त्या रुग्णाच्या जीवास धोका पोहोचण्याची शक्यता असते. -डॉ.ए.व्ही.सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा.