शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा पॅनलचा एकतर्फी विजय

By admin | Updated: May 26, 2015 02:25 IST

चिखली कृउबास निवडणूक; सेनेच्या पवारांनी राखली भाजपाची लाज.

चिखली (बुलडाणा ) : संपूर्ण जिल्हय़ाचे लक्ष वेधलेल्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वातील बळीराजा पॅनलने प्रतिस्पर्धी शिवराणा तसेच भाजपा व शेतकरी संघटना प्रणीत पॅनलचा धुव्वा उडवित एकूण १८ पैकी १७ जगांवर दणदणीत एकतर्फी विजय मिळवित राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या संस्थेवर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर या निवडणुकीत भाजपा व शेतकरी संघटना प्रणीत पॅनलच्या माध्यमातून हमाल-मापारी मतदारसंघातून निवडणूक लढविणारे शिवसेनेचे गजानन मापारी यांनी विजय मिळविला आहे.गत निवडणुकीत आ. राहुल बोंद्रे यांनी प्रस्थापित दिग्गज नेतेमंडळींविरोधात स्वत:च्या नेतृत्वात निवडणूक लढवून बाजार समितीत एकहाती सत्ता मिळविली होती. त्या पार्श्‍वभूमीवर या निवडणुकीत सहकारातील दिग्गज नेते माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, जनुभाऊ बोंद्रे, भारत बोंद्रे, बाबुराव पाटील व ऐनवेळी हातमिळवणी केलेले माजी आमदार धृपदराव सावळे यांनी पक्षीय जोडे बाहेर काढून आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणीत बळीराजा पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली. तर काँग्रेसचेच माजी जि.प. अध्यक्ष तथा शिवराणा मित्रमंडळाचे संस्थापक प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, आ.डॉ. शशिकांत खेडेकर, उपजिल्हाप्रमुख डॉ. प्रतापसिंग राजपूत यांच्याशी हातमिळवणी करून बळीराजा पॅनलविरोधात शिवराणा पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीत मांड ठोकली होती.