मेहकर : दुकान उघडत असतांना हातातील एक लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १९ मे रोजी सकाळी ९ वाजता येथील अंजाना चौकात घडली. रमेश हनुमानदास अग्रवाल सोमवारी सकाळी त्यांचे किराणा दुकान उघडत असतांना अचानकपणे एका अज्ञात ईसमाने त्यांच्याकडील एक लाख रुपयांची बॅग पळवुन नेली. दुकान मालकाच्या लक्षात येईपर्यंत अज्ञात इसम बॅग घेऊन फरार झाला होता. यापुर्वीही बस स्टँडमध्ये चोरीच्या घटना घडल्या असून पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
एक लाख रुपयांची बॅग लंपास
By admin | Updated: May 20, 2014 00:41 IST