सिंदखेडराजा (बुलडाणा) : स्थानिक बसस्थानकासमोरील एका मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख रुपये लं पास केल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली. शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे शहरवासियांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बसस्थानकासमोरील महामार्गावर येथील मतीन खान अहेमद खान पठाण यांच्या मालकीची मोबाईल शॉपी आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानाचे कुलूप उघडून अर्धे शटर्स उघडे असल्याचे शेजारचे हॉटेल मालक लहु पांढरे यांना आज सकाळच्या दरम्यान आढळून आले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती मतीन खान अहेमदखान पठाण यांना दिली. तेव्हा अज्ञात चोरट्यांनी दुकानातील १२ मोबाईल, १५ बॅटरी, ७५ डिस्प्ले, मोबाईल दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य, असा एकूण १ लाख रुपयांचा माल लंपास केला आहे. यासंदर्भात मतीनखान अहेमदखान पठाण यांनी सिंदखेडराजा पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.
मोबाईल शॉपीमधून १ लाखाचा ऐवज लंपास
By admin | Updated: November 24, 2014 00:31 IST