किनगावजट्ट (ता. लोणार, जि. बुलडाणा) : किनगावजट्टकडून लोणारकडे जाणार्या दुचाकीची व टाटामॅजिकची समोरासमोर जबर धडक झाली. यामध्ये दुचाकीचालक जागेवरच ठार झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज १२ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान लोणार मार्गावरील भुमराळा फाट्यानजीक घडली. लोणार येथील गजानन जाधव (५५) हे आपल्या २ मुली व १ मुलासह एम.एच.२८- ५७२२ क्रमांकाच्या मोटारसायकलने काही कामानिमित्त किनगावजट्टकडून लोणारकडे जात होते. दरम्यान समोरुन भरधाव वेगात येणार्या एम.एच.२८ व्ही.६५४६ क्रमांकाच्या टाटा मॅजिक या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या जोरदार धडकेत गंभीर दुखापत होऊन दुचाकीवरील गजानन जाधव हे जागेवरच ठार झाले. तर त्यांच्या दोन मुली व एक मुलगा गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वृत्तलिहेस्तोवर पोलिस तपास सुरु होता.
दुचाकी अपघातात एक ठार, तीन जखमी
By admin | Updated: October 13, 2014 01:06 IST