या अपघातामध्ये जीपमधील उज्वला मुकुंदराव देशमुख (६५, रा. गाडेगनगर, अमरावती) या ठार झाल्या असून डॉ. निलेश अशोकराव सानप (रा. लोणार) हे जखमी झाले आहेत. दरम्यान, आशा अशोकराव सानप, आदिती निलेश सानप आणि रिशांत व आवेश सानप ही दोन लहान मुले या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. डॉ. निलेश सानप व त्यांचे कुटुंब सकाळी देऊळगावराजा येथे बालाजी दर्शन व अभिषेक करायला गेले होते. परत लोणारला जात असताना राहेरी जवळ समृद्धी महामार्गाच्या सिमेंट मिक्सर ट्रक व त्यांच्या जीपमध्ये अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार युवराज रबडे. बनसोड. श्रावण डोंगरे डोईफोडे शेख जाकीर गवई यांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार युवराज रबडे हे करीत आहेत.
सिमेंट मिक्सर ट्रक व जीपच्या अपघातात एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:38 IST