शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार ग्रामपंचायत कर्मचारी वेतनापासून वंचित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:56 IST

बुलडाणा : ग्रामपातळीवर पाणीपुरवठा व सफाई आदी कामे करणारे जवळपास दीड हजार ग्रामपंचायत कर्मचारी मागील ६ महिन्यापासून वेतनापासून वंचित आहेत. याशिवाय त्यांना राहणीमान भत्ता व बोनस देण्यात येत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची उपासमार सुरू आहे. 

ठळक मुद्देकर्मचा-यांचा आंदोलनाचा इशारा राहणीमान भत्ता व दिवाळी बोनस देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ग्रामपातळीवर पाणीपुरवठा व सफाई आदी कामे करणारे जवळपास दीड हजार ग्रामपंचायत कर्मचारी मागील ६ महिन्यापासून वेतनापासून वंचित आहेत. याशिवाय त्यांना राहणीमान भत्ता व बोनस देण्यात येत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची उपासमार सुरू आहे. जिल्ह्यात जवळपास दीड हजार कर्मचारी ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणे, सफाई करून स्वच्छता ठेवणे आदी कामे करतात. मात्र, कर्मचाºयांना मागील सहा महिन्यांपासून किमान वेतन वसुली अभावी मिळत नसल्यामुळे उपासमारीची वेळ ग्रा.पं.कर्मचारी यांचेसह त्यांचे कुटुंबावर आलेली आहे. तसेच त्यांना महागाई भत्ता व बोनस देण्यात येत नसल्यामुळे कुटुंबियांचे पालन पोषण कसे करावे, अशा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला आहे. पंधरा दिवसावर दिवाळी सण आला आहे. अशा परिस्थितीत वेतनापासून वंचित कर्मचारी दिवाळी सण कसा साजरा करणार, कुटुंबियांचे पालन पोषण कसे करणार या विवंचनेत आहेत. तरी ग्रा.पं.कर्मचारी यांची दिवाळी अंधारात जावू नये व त्यांचेसह त्यांच्या कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ येवू नये याकरीता राहणीमान भत्त्यासह किमान वेतन दिवाळी अगोदर देवून ग्रा.पं. कर्मचाºयांना दिवाळी बोनस सुध्दा देणे आवश्यक आहे. ज्या ग्रा.पं. कर्मचाºयांना दिवाळी अगोदर किमान वेतन, राहणीमान भत्ता व दिवाळी बोनस देणार नाही, अशा ग्रा.पं. ग्रामसेवकांचे वेतन व सरपंच मानधन देण्यात येवू नये, अशी मागणी महाराष्टÑ राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर गायकी, अध्यक्ष शिवसिंग सोळंकी, जि.सचिव रामेश्वर डिवरे, जि.संघटक सुरेश सपकाळ, संघटक पी.पी.पिसे आदींनी केली आहे.

ग्रामपंचायत कर्मचाºयांना वेतनासह राहणीमान भत्ता व दिवाळी बोनस देणे आवश्यक आहे. याबाबत शासन निर्णयानुसार  कार्यवाही करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने जिल्हा परिषद, बुलडाणा यांचेसमोर आमरण उपोषण करण्यात येईल.- रामेश्वर डिवसे, सचिव, महाराष्टÑ राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, बुलडाणा.