शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन, अनलॉकदरम्यान जिल्ह्यात दीड हजार गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:32 IST

बुलडाणा: लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गाच्या प्रारंभीक काळातील ११७ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल दीड हजार गुन्हे दाखल झाले होते. यापैकी ...

बुलडाणा: लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गाच्या प्रारंभीक काळातील ११७ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल दीड हजार गुन्हे दाखल झाले होते. यापैकी वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल १ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल केल्या गेला होता. दाखल गुन्ह्यांमध्ये तब्बल २,५४९ जणांना अटकही करण्यात आली होती.या कालावधीत जिल्ह्यातंर्गत आणि राज्याच्या सिमांवर एकूण ३३ चेकपोस्ट उभारण्यात आल्या होत्या. लॉकडाऊनच्या काळात प्रामुख्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले होते. थोडक्यात संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण या कालावधी वाढले होते. त्यासंदर्भाने २१ गुन्ह्यांची पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली होती. यातील १३३ पैकी ७६ आरोपींना अटकही केल्या गेली होती. त्यामुळे कोरोनाचा पहिल्या टप्प्यातील हा काळ फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून पोलिसांसाठी मोठा कठीण गेला होता.

--क्वारंटीन संदर्भात ३९ व्यक्तींवर गुन्हे--

लॉकडाऊन दरम्यान कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता संदिग्धांना क्वारंटीन करण्यात येत होते. मात्र या नियमांचे उल्लंघन केल्या जात होते. पोलिसांनाही जुमानल्या जात नव्हते. त्यामुळे अशा प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये ३९ व्यक्ती आरोपी होते. १५ प्रकरणांचा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय स्तरावरून तपास केल्या गेला होता.

--११ टक्क्यांनी वाढली गुन्हेगारी--

कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांवर ताण वाढला होता. तपासणी नाके, प्रतिबंधीत क्षेत्रात पोलिसांना कर्तव्यावर ठेवण्यात आले होते. त्यामुळे बऱ्याच पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे लॉकडाऊन काळात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते. परिणामस्वरुप २०१९ च्या तुलनेत २०२० या वर्षात जिल्ह्यात ११ टक्क्यांनी गुन्हेगारी वाढल्याचे समोर आले होते. वास्तविक जेथे २,७३२ पोलिस कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ २६०० पोलिस कर्मचारी या कालवधीत कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच कोरोना प्रतिबंधाच्या कालावधीत फ्रंटलाईन वर्कर्स म्हणन काम करत होते. त्याततही ३३ पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही पोलिस दलात कमतरता होती. आताही मनुष्यबळाच्या बाबतीत असेच चित्र आहे. त्यामुळे २६ लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात पोलिस दलता मनुष्यबळ उपलब्ध करणे गरजेचे आहे.