शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

 तलावातून दीड हजार ब्रास गौण खनिजाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 17:24 IST

खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील तलावातून १९ आणि २० जून रोजी सलग दोन दिवस हजारो ब्रास मुरूमाची चोरी करण्यात आली.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गत काही दिवसांपासून तालुक्यात गौण खनिज चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते. खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील तलावातून १९ आणि २० जून रोजी सलग दोन दिवस हजारो ब्रास मुरूमाची चोरी करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार स्थानिकांनी महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, तरीही तब्बल दोन दिवस मंडळ अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. त्यामुळे तालुक्यातील संघटीत गौण खनिज चोरीला महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाºयांचे पाठबळ असल्याचे विविध घटनांवरून दिसून येत आहे.खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील केदारेश्वर मंदिरा जवळ एक पुरातन तलाव आहे. या  तलावातून १९ आणि २० जून रोजी दिवस रात्र हजारो ब्रास मुरूमाची चोरी करण्यात आली. दोन जेसीबी आणि  ८-१० ट्रॅक्टरच्या साहाय्याने उचल करण्यात आलेल्या या मुरूमाचा खासगी शेत रस्त्यासाठी तर एका निर्माणाधिन पेट्रोलपंपासाठी वापर करण्यात आला. खासगी शेत रस्ता हा बोरजवळा शिवारातील एका राजकीय नेत्याचा तर, निपाणा येथील निर्माणाधीन पेट्रोलपंप खामगाव येथील एका व्यक्तीचा असल्याचे समजते. दरम्यान, हा प्रकार चव्हाट्या आल्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदारांनी मंडळ अधिकाºयांना तात्काळ तपासणी आणि चौकशीच्या सूचना दिल्या. मात्र, तब्बल दोन लोटल्यानंतरही मंडळ अधिकारी तेथे पोहोचले नाहीत. गौण खणिज चोरी करणाºयांनी जेसीबी आणि ट्रॅक्टर घटनास्थळावरून हलविल्यानंतर अखेर शुक्रवारी दुपारी तलाठी वैशाली गवळी  बोरजवळा येथील तलावावर पोहोचल्या. कल्याणसिंह तोमर, मेहेरबानसिंह तोमर, पोलिस पाटील ईश्वरसिंह तोमर, राजेंद्र दिवनाले, भागवत तोमर, श्याम जाधव यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. पंचनाम्याचा अहवाल तलाठी गवळी यांनी वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला. यासंदर्भात तहसीलदार शीतल रसाळ आणि मंडळ अधिकारी किशोर रत्नपारखी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.

 मंडळ अधिकारी ‘नॉट रिचेबल’!बोरजवळा येथील तलावातून मुरूमाची चोरी होत असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी तहसीलदारांना १९ जून रोजी कळविला. त्यांनी तात्काळ मंडळ अधिकाºयांना तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, तब्बल दोन दिवसांपर्यंत मंडळ अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. त्यानंतर शुक्रवारी जेसीबी आणि साहित्य घटनास्थळावरून लांबविण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी तलाठी पंचनाम्यासाठी उपस्थित झाल्या. त्यामुळे गौण खनिज चोरट्यांचे महसूल प्रशासनाशी साटेलोटे असल्याचा आरोप बोरजवळा येथील ग्रामस्थांनी केला आहे.

 साडेपाच लाख रुपयांचा चूना!तलावात चार मोठे खड्डे खोदण्यात आले. या खड्यातून सुमारे एक ते दीड हजार ब्रास मुरूमाची चोरी करण्यात आली. विना रॉयल्टी मुरूमाचा उपसा झाल्याने तब्बल साडेपाच लाख रुपयांचा चूना प्रशासनाला लागला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे. 

 वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश मिळताच बोरजवळा येथील तलावाला भेट दिली. चोरी गेलेल्या गौण खनिजाची मोजणी केली. यासंदर्भात सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. आपणाकडून चौकशी आणि पंचनाम्यासाठी कोणताही विलंब करण्यात आला नाही.- वैशाली गवळीतलाठी, बोरजवळा, ता. खामगाव.

 तलावातून गौण खनिजाची चोरी होत असल्याचे तात्काळ तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, महसूल स्तरावरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मंडळ अधिकारी घटनास्थळी पोहोचले देखील नाहीत. मंडळ अधिकारी वेळेवर हजर झाले असते तर, गौण खनिजाची रंगेहात चोरी पकडल्या गेली असती.- कल्याणसिंह तोमरतक्रारकर्ता, बोरजवळा ता. खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा