शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

विवाह सोहळ्यांवर वाढले पुन्हा एकदा कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:35 IST

राहेरी - कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे ग्रामीण भागातील व्यावसायिक तसेच हातमजूर अडचणीत सापडले आहेत. अनलॉकनंतर आता कुठे सर्वच व्यवहार हळूहळू ...

राहेरी - कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे ग्रामीण भागातील व्यावसायिक तसेच हातमजूर अडचणीत सापडले आहेत.

अनलॉकनंतर आता कुठे सर्वच व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत होते; मात्र पुन्हा कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यामुळे सुरू झालेले व्यवहार, उद्योग पूर्ण बंद करावे लागतात की काय, अशी परिस्थिती सध्या शहरांसह ग्रामीण भागात दिसून येत आहे. अगोदरच लग्नकार्य, धार्मिक सोहळे यासह इतर अनेक धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याने निगडीत सर्व व्यवसायांवर संकट आले आहे. आता परत एकदा घातलेल्या मर्यादेमुळे पुन्हा व्यवसाय अडचणीत आला असून, यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेने सर्वांना घेरले आहे, तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लग्न सोहळा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या सोहळ्यात माणूस कोणतीही तडजोड करत नाही. आयुष्यात लग्न एकदाच होते. त्यामुळे ते धूमधडाक्‍यात व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अलीकडे लग्ने ही घरासमोर न करता लॉन्स किंवा मंगल कार्यालयात केली जातात. त्या ठिकाणी सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतात तसेच कुटुंबातील व्यक्तींची धावपळ होत नाही. लॉन्सचा मालक वाद्य, जेवण, मिरवणुकीसाठी आवश्यक असणारा घोडा, मंत्रघोष करणारा पुजारी, जेवणाची सर्व सोय, पाहुण्यांची देखभाल करणारे केटरर्स, हार-पुष्पगुच्छ, छायाचित्रकार, आर्केस्ट्रा असे सर्व एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे सर्वात जास्त कल हा लाॅन्सवर लग्न करण्याकडे असतो. एका लग्नावर जवळपास दहा व्यवसाय अवलंबून असतात. त्यामुळे त्यांचे कुटुंब आणि आर्थिक बजेट सर्व याच व्यवसायावर अवलंबून असते. शिवाय लॉन्स मालकाला विविध प्रकारचे सरकारी कर भरावे लागतात. यंदा मात्र जवळपास एक वर्ष लग्नसोहळे बंद होते. यादरम्यान अनेकांनी घरापुढे चार पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न लावले; परंतु त्यानंतर या विवाह सोहळ्यांना परवानगी मिळाली, तीसुद्धा अनेक अटींवर. यामुळे पूर्वीसारखे थाटामाटाचे दिवस आता नाहीत. कोरोना संकट आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी लग्न सोहळा अवघ्या पन्नास माणसांच्या उपस्थितीत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. लग्नसोहळे थोडक्या माणसात साजरे करण्याचे फर्मान काढल्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

आताच्या घडीला लग्नप्रसंगीसुद्धा वऱ्हाडी मंडळी मास्क न घालता बेफिकीर फिरत आहेत. म्हणून आपणच कोराेना संक्रमण वाढीस जबाबदार आहोत; पण एका सोहळ्यावर अनेक व्यवसाय अवलंबून असतात. त्यामुळे लग्न समारंभ साजरे करण्यासाठी नियमांचे कठोर पालन करून उद्योग सुरू ठेवण्याची मागणी व्यावसायिक करत आहेत.

*

गेल्यावर्षीपासून कोविडमुळे लग्न समारंभाला मर्यादा आल्यामुळे आमच्या बिछायत केंद्र व्यवसायावर फार मोठे संकट आले असून, आमचा बिछायत केंद्र व्यवसाय २० टक्क्यांवरच आला आहे. तरी मला यामुळे किराणा दुकान पर्याय म्हणून सुरू करावे लागले आहे.

अशोकराव सोनुने,

बिछायत केंद्र, राहेरी बु ....