शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मानधनाअभावी वृद्धांची फरफट!

By admin | Updated: February 19, 2016 01:38 IST

संजय गांधी निराधार योजनेच्या समितीअभावी कामे झाली ठप्प.

बुलडाणा: भाजप-शिवसेना युतीच्या शासनाने सत्ता स्थापन करून वर्ष उलटून गेले तरी विविध लोकपयोगी योजना गतिमान करण्यासाठी कार्यरत यंत्रणा कमी पडत आहे. परिणामी लोकांची कामे विलंबाने होत आहेत. महसूल विभागांतर्गत तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक तहसील कार्यालयाला संजय गांधी निराधार योजनेची समिती आहे. मागील सरकारच्या कार्यकाळातील या समित्या बरखास्त करण्यात आल्या. आता नव्याने या समित्या कार्यान्वित करणे गरजेचे असताना, त्यांचे पुनर्गठण अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे श्रावण बाळ, वृद्धापकाळ व संजय गांधी निराधार योजनेची कामे रखडली आहेत. त्यामुळे वृद्धांची फरफट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात १३ तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्यात समिती आहे. यापैकी एकाही तालुक्यातील समिती अद्याप गठित करण्यात आलेली नाही. सत्ताधारी राजकीय पक्षांचे वर्चस्व असलेल्या या समित्यांचे अध्यक्ष तथा सदस्य हे निराधार, वृद्ध तथा अपंग, विधवा, घटस्फोटित यांसह विविध गटांत मोडणार्‍या विविध प्रकरणांची नियमानुसार तपासणी करून प्रस्तावाला मंजुरी देत असतात; परंतु मागील एक वर्षापासून समित्या गठित झाल्या नसल्यामुळे कामे रेंगाळली आहेत. प्रकरणे निकाली काढण्यास अधिक विलंब होत आहे. ग्रमीण भागातील गोरगरीब, निरा२िँं१्रूँं१त, विधवा, परितक्त्या घटकातील लोकांचा जगण्याचा केवळ हाच एक आधार असल्यामुळे सामाजिक न्यायाच्या भावनेतून सत्ताधार्‍यांनी याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. महागाई वाढल्याने वृद्ध, निराधार, अनाथ लाभार्थींंची दोन वेळच्या जेवणाची भ्रांती असून, ते शासनाकडे मद तीचा हात मागत आहे. धन तर दूरच, साधा मानही सामान्यांना मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.