शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पंधरावर्षे जुनी वाहने रस्त्यावर

By admin | Updated: December 22, 2014 23:42 IST

वाहनांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह : फक्त १0 वाहनांवर कारवाई.

बुलडाणा : रस्त्यावर धावणारे खासगी प्रवाशी वाहन सुरक्षीतता तपासन्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनांची फिटनेस चाचणी घेण्यात येते; मात्र, २00१ पासून नवीन टॅक्सी परवाना देणे बंद असल्यामुळे नवीन वाहन रस्त्यावर आले नाहीत. यामुळे १५ ते २0 वर्ष जूनी खासगी प्रवाशी वाहने आजही जिल्ह्यातील रस्त्यावर धावत आहेत. परिणामी वाहनांच्या फिटनेससह या वाहतून प्रवास करणार्‍या प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहर व जिल्ह्यात खासगी प्रवाशी वाहतूक करणारी हजारो वाहने आहेत. दरवर्षी या वाहनांचा फिटनेस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासला जातो. यात वायु प्रदूषण चाचणी, हेडलाईट चाचणी, व्हील अलायनमेंट चाचणी, ब्रेक चाचणी, चेचीस व बॉडी नंबर चाचणी या कामासाठी आरटीओकडे केली जाते. वाहनचालकांना वायुप्रदूषण केंद्राकडून वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र सादर करावे लागते. या निकषावर न उतरणारे वाहन कायमस्वरूपी अनफिट ठरविले जाते. राज्य शासनाने २00१ मध्ये आदेश काढून मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यात टॅक्सी (काली िपली) साठी परवाना देण्याचे बंद केले. यावेळी जिल्ह्यात १७६३ टॅक्सी परमीट असलेले वाहन रस्त्यावर धावत होते. यानंतर कुठलीही नवीन टॅक्सी परमीट वाहने जिल्ह्यातील रस्त्यावर आली नाही. मात्र पंधरावर्ष जुनी वाहने आजही रस्त्यावर धावताना दिसतात. यामुळे जिल्ह्यात अपघाताचे प्रमाणाही वाढत असल्यामुळे वाहनाच्या फिटनेसर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांच्याशी संबंध साधला असता त्यांनी वाहनांचा फिटनेस तपासण्याची मोहीम सप्टेंबर महिण्यापासून हाती घेण्यात आली असल्याचे सांगीतले. वर्षानुवर्षे वाहनांचा फिटनेस न तपासणार्‍या सदोष वाहनधारकांवर कठोर कारवाई केली जात आहे. वाहनधारकांनी मुदतीत आपल्या वाहनांची फिटनेस तपासणी करून कारवाईपासून स्वत:ची मुक्तता करण्याचे अवाहन त्यांनी यावेळी वाहनधारकांना केले. *दहा वाहनांवर कारवाई नांदुरा तालुक्यात १0 डिसेंबर रोजी कालीपिली वाहनातून पडून एक महिला ठार झाली होती. त्यामुळे वाहनाच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.यातुन स्थानिक उपप्रादेशिक विभागाकडून नांदुरा व खामगाव येथे वाहन फिटनेस तपासणी राबविण्यात आली. यात १0 वाहन अनफिट आढळून आल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.