शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हगणदरीमुक्ती कागदावरच : शौचालये बांधली; मात्र वापर नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 12:15 IST

Buldhana News शाैचालये बांधण्यात आली आहेत; मात्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये त्यांचा वापरच हाेत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

ठळक मुद्देपुरस्कार मिळविणाऱ्या गावातही हगणदरी कायम असल्याचे चित्र आहे.  कुठलीही पडताळणी हाेत नसल्याने गैरप्रकार समाेर आला नाही. ग्रामीण भागात गुड माॅर्निंग पथके कार्यान्वित करण्याची गरज आहे. 

 लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काेट्यवधी रुपयांचा खर्च करून घराेघरी शाैचालये बांधण्यात आली आहेत; मात्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये त्यांचा वापरच हाेत नसल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. एवढेच नव्हे तर पुरस्कार मिळविणाऱ्या गावातही हगणदरी कायम असल्याचे चित्र आहे. शाैचालय बांधण्यासाठी राज्य शासन काेट्यावधी रुपयांचे अनुदान देते. पाच वर्षात ३ लाख ८४ हजार २२७ शाैचालये बांधण्यात आली आहेत. शाैचालयांचे उद्दिष्ट पूर्ण झाली असली तरी ग्रामस्थ त्याचा वापरच करत नसल्याचे अमडापूर, डाेणगावसह इतर गावांमध्ये आढळले. गावांमध्ये केवळ अनुदान घेण्यासाठी शाैचालये बांधण्यात आली आहेत. अनेक गावांमध्ये शाैचालय अनुदानातही माेठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत. एकाच लाभार्थ्यांना दाेनदा अनुदान देण्यात आले आहेत. याची कुठलीही पडताळणी हाेत नसल्याने गैरप्रकार समाेर आला नाही. तसेच शाैचायलांचा वापर ग्रामस्थ करीत आहेत किंवा नाही याविषयी ग्रामंपचायत प्रशासन कुठलीही पडताळणी करीत नसल्याने शाैचालये अडगळीत पडल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आहे. त्यामुळे शाैचालयांचा वापर न करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. तसेच ग्रामीण भागात गुड माॅर्निंग पथके कार्यान्वित करण्याची गरज आहे. 

शौचालयांचा वापर      इंधन ठेवण्यासाठीजिल्ह्यातील अनेक गावांमध्ये इंधन ठेवण्यासाठी शाैचालयाचा वापर करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी शाैचालयांना कुलूप लावण्यात आले आहे. शाैचालयांना पाणी जास्त लागते. ग्रामीण भागात कायम पाणीटंचाई असते. त्यामुळेही शाैचालयांचा वापर हाेत नसल्याचे चित्र आहे. काही ग्रामस्थांची मानसिकता कायम आहे.

‘जैसे थे’ स्थिती हगणदरीमुक्त झालेल्या गावांना राज्य व जिल्हा स्तरावर पुरस्कार देण्यात आलेले आहेत; मात्र पुरस्कार मिळाल्यानंतर या गावांमध्ये हगणदारी कायम असल्याचे चित्र आहे. अनेक गावे केवळ कागदावरच हगणदरीमुक्त झाल्याचे चित्र आहे.

ऐनखेड गावाला सन २०१५,१६ हगणदरीमुक्त ग्रामचा पुरस्कार मिळाला हाेता. ६०० लाेकसंख्या असलेल्या गावात घराेघरी शाैचालये बांधण्यात आली आहे. तसेच त्याचा वापरही ग्रामस्थ करीत आहेत. - श्रीकांत गिऱ्हे, माजी सरपंच, ऐनखेड

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान