शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२३ नोव्हेंबरपासून स्वीकारणार हरकती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 02:39 IST

पदवीधरांना तपशिलातील चुका दुरुस्त करण्याची संधी.

मोताळा, दि. १७- अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील नोंदणी झालेल्या अर्जांंंच्या छाननी प्रक्रियेनंतर तयार करण्यात आलेल्या यादीवरील हरकती व सूचना आगामी २३ नोव्हेंबरपासून स्वीकारल्या जाणार आहेत. याच दिवशी या मतदार यादीचे प्रारूप घोषित केले जाणार आहे. त्यामुळे नाव, पत्ता, शिक्षण, वय अशा वैयक्तिक स्वरूपातील तपशीलातील चुका दुरुस्त करून घेण्यासाठीची ही संधी आहे.अमरावती पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीसाठी मतदार मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवसपर्यंंंत मोताळा तालुक्यातून १,१९६ तर जिल्हय़ात ३४,९७७ मतदारांनी नोंदणी केली. प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननीची प्रक्रिया संपली असून, अर्जासोबत जोडलेल्या कागदपंत्रांची तपासणी करून नाव, पत्ता, छायाचित्रांचे संगणीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अर्ज नोंदणीदरम्यान शेवटच्या टप्प्यात मोठय़ा प्रमाणात नोंदणी झाल्यामुळे घाई गडबडीत प्रशासनाला प्राप्त झालेल्या अर्जांंंमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत. चुकलेल्या अर्जांंंचा निर्णय जिल्हा प्रशासन घेणार असले तरी पदवीधरांना २३ नोव्हेंबर रोजी चूक दुरुस्त करण्याची संधी मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार पदवीधर मतदारसंघाची प्रारूप यादी २३ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या काळात प्रत्येक तहसील कार्यालये आणि निवडणूक यंत्रणांच्या कार्यालयात उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधितांनी त्या ठिकाणी जाऊन आपापला तपशील योग्य आहे की, नाही, हे तपासून घ्यायचे आहेत.