शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तांदळाअभावी पोषण आहार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:02 IST

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : कार्यवाही करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात जि.प.प्राथमिक शाळेला पोषण आहाराचा तांदूळ उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणे बंद झाला आहे. या संपूर्ण प्रक्रियेला पंचायत समितीचा शिक्षण विभाग जबाबदार धरल्या जात आहे. हा तांदूळ केव्हा मिळणार, याबाबत समर्पक उत्तर कोणीच देत नसल्याने यातील गोडबंगाल काय, याची चर्चा सुरू आहे. तालुक्यात जि.प.प्राथमिक आणि माध्यमिक शाळा १८५ च्या जवळपास आहे. शाळा सुरू होऊन तब्बल एक महिना लोटला आहे. या एका महिन्यात किमान १०० क्विंटल तांदूळ पोषण आहारासाठी लागतो. विद्यार्थ्यांची पटसंख्या गृहीत धरुन हा तांदूळ प्रत्येक शाळेला वितरित करण्यात येतो. ही जबाबदारी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची असते. पं.स.चा शिक्षण विभाग यावेळी एवढा ढेपाळला आहे की, कोणतीही माहिती देण्यासाठी कचरत आहे. सवडदकर नामक गटशिक्षणाधिकारी येथे कार्यरत असताना त्यांची अचानक बदली झाली. आमसभेत विचारलेल्या एकाही प्रश्नाचे सकारात्मक उत्तर त्यांनी दिले नाही. त्यानंतर चौकशी करून लेखी उत्तरही त्यांनी दिले नाही. त्यांच्या बदलीनंतर दादाराव मुसदवाले यांनी चौथ्यांदा गटशिक्षणाधिकाऱ्यांचा कारभार हाती घेतला. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर ते संपर्कात येत नाही. केव्हाही दौऱ्यावर ते असतात. त्यानंतर त्यांच्या जागेवर महेश सुळे यांच्याकडे या विभागाचा कारभार देण्यात आला असल्याचे समजते; पण ते सुट्टीवर असल्याने शिक्षण विभागाचा कारभार रामभरोसे झाला आहे. शालेय पुस्तकाची आजही टंचाई भासत असून, रोहिलेल्या मुलांना पुस्तके केव्हा पुरविणार, हाही प्रश्न निर्माण होतो, तरी याबाबत चौकशी करून शालेय विद्यार्थ्यांना खिचडीपासून वंचित ठेवण्याचे काम करणाऱ्यांची चौकशी करावी, तरी संबंधित दोषीविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.जि.प.प्राथमिक शाळेतील मुलांना पहिल्या दिवसापासून पोषण आहार देण्यात यावा, असा सक्त आदेश असताना विद्यार्थ्यांना पोषण आहार का दिल्या जात नाही, याची चौकशी करण्यात यावी.- दत्ता लष्कर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती.एप्रिल महिन्यातच २५ दिवसांचा पोषण आहार प्रत्येक शाळेवर पाठविला होता. काही मुख्याध्यापकांनी तो उतरविला नाही. त्यामुळे २७ जूनला शाळा सुरु होऊनही विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळाला नाही. त्या संबंधित मुख्याध्यापकांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल.- आर.जी.मखमलेशिक्षण विस्तार अधिकारी, पं.स.सिंदखेडराजा.