शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बुलडाणा जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:32 IST

बुलडाणा : यावर्षी समाधानकारक पावसामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यातच बाष्पीभवनाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असून,  पाणी पुरवठा योजना असलेल्या प्रकल्प व धरणातील पाणीसाठा कमी-कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली असून, आज रोजी १२ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, ८८ गावात खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देबाष्पीभवनाचा फटका १२ गावात टँकर तर ८८ गावात विहिरींचे अधिग्रहण

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : यावर्षी समाधानकारक पावसामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यातच बाष्पीभवनाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असून,  पाणी पुरवठा योजना असलेल्या प्रकल्प व धरणातील पाणीसाठा कमी-कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली असून, आज रोजी १२ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, ८८ गावात खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मागील वर्षी शेवटी दमदार पावसाळा झाल्यामुळे उन्हाळ्यात काही गावात पाणीटंचाई निर्माण झाली होती; मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पात अल्प जलसाठा आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच बाष्पीभवनामुळे काही प्रकल्पात आतापासून पाण्याचा ठणठणाट आहे, तर जमिनीखालील पाण्याची पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर २०१७ ते जून २०१८ नुसार कृती आराखडा प्रस्तावित केला होता. या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ७९७ गावासाठी १ हजार १४८ उपाययोजना करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. यासाठी १८९४.२५ लक्ष रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापैकी  १०५ गावातील १२७ उपाययोजनांसाठी १८०.२० लक्ष रुपयांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ९८ गावात ११९ उपाययोजना करण्यात आल्या असून, त्यासाठी ४४.४९ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत. उपाययोजनांमध्ये ९८ गावात विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून, अडचणीच्या चिखली तालुक्यातील ३, देऊळगाव राजा तालुक्यातील ३, सिंदखेड राजा तालुक्यात १, खामगाव तालुक्यात २, शेगाव तालुक्यात १ व मोताळा तालुक्यातील २ अशा प्रकारे ६ तालुक्यातील १२ गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

या गावात सुरू आहे टँकरद्वारे पाणीपुरवठा जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आज रोजी १२ गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात चिखली तालुक्यातील मेरा बु., चंदनपूर, रानअंत्री, देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रानंदई, नागणगाव, सरंबा, सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगाव, खामगाव तालुक्यातील जळकातेली, लांजूड, शेगाव तालुक्यातील चिंचोली व मोताळा तालुक्यातील गुगळी, कोल्ही गवळी या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा