शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसंख्या घटली, वाढत्या मृत्यूने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:36 IST

बुलडाणा : जिल्ह्यात दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असतानाच, वाढत्या मृत्यूने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दाेन दिवसांत ...

बुलडाणा : जिल्ह्यात दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असतानाच, वाढत्या मृत्यूने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दाेन दिवसांत तिघांचा काेराेनाने मृत्यू झाला हाेता़, तसेच साेमवारी आणखी तिघांचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला असून, एकही मृत्यू झाला नाही, चार रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. २४ जुलै राेजी दाेन आणि २५ जुलै राेजी एका रुग्णाचा काेराेनाने मृत्यू झाला आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शेगाव तालुका कालखेड १, सि.राजा तालुका मलकापूर पांग्रा १, चिखली तालुका गोद्री येथील एका रुग्णाचा समावेश आहे, तसेच आजपर्यंत ६ लाख २९ हजार ८६४ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज रोजी १,३११ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८७ हजार २४० कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ८६ हजार ५५२ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे १६ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत, तसेच आजपर्यंत ६७२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

दहा तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नाही

जिल्ह्यात काेराेनाची तिसरी लाट ओसरत असून, अनेक तालुके काेराेनामुक्तीच्या वाटेवर आहेत. साेमवारी दहा तालुक्यांत एकही नवीन रुग्ण आढळला नाही. यामध्ये बुलडाणा, खामगाव, चिखली, मेहकर, नांदुरा, लाेणार, माेताळा, जळगाव जामाेद आणि संग्रामपूर या तालुक्यांचा समावेश आहे.