शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांची संख्या पोहोचली ५१६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:28 IST

Dengue in Buldhana डेंग्यू रुग्णांची संख्या कमी होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

-  सदानंद सिरसाट

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोना सोबतच अन्य आजार डोके वर काढत असून, बुलडाणा जिल्ह्यात डेंग्यूचे आतापर्यंत तब्बल ५१६ रुग्ण झाले आहेत. पावसाळ्यानंतर साथरोग उद् भवण्याची शक्यता आरोग्य विभागाने आधीच व्यक्त केली होती. आता मात्र, डेंग्यू रुग्णांची संख्या कमी होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असते. डासांची उत्पत्ती आणि वाढीस पोषक वातावरण असल्याने सप्टेंबर ते नाेव्हेंबर या काळात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढते. डिसेंबरमध्ये तापमानात घट झाल्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होत जातो. तसा डेंग्यूचा प्रसारही थांबतो. बुलडाणा जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत ५१६ रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यूचे रुग्ण दाखल असल्याची माहिती खासगी रुग्णालयांतून दिली जात नाही. डेंग्यूसारख्या सर्वच आजारांची माहिती तत्काळ  स्थानिक स्वराज्य संस्थांना देणे बंधनकारक आहे. मात्र, काही रुग्णालयातून ती नियमितपणे दिली जात नसल्याची माहिती आहे.  त्यामुळे आता कोरोना पाठोपाठ डेंग्युचा धोका जिल्ह्यात निर्माण झाला आहे.

यावर्षी डेंग्यू रोगाची साथ आटोक्यात आहे. लवकरच रुग्णसंख्या झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, आता घाबरण्याचे कारण नाही. - डाॅ. एस.बी.चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :dengueडेंग्यूkhamgaonखामगावbuldhanaबुलडाणा